अकोलाः पत्रकार पेन्शन योजना,पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी,मजिठियाची अंमलबजावणी,छोटया वृत्तपत्रांचे जाहिरात व अन्य प्रश्न आदि प्रश्नांचा मराठी पत्रकार परिषद सतत पाठपुरावा करीत असून आज परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पत्रकारांच्या जिव्ङाळ्याच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले.मुख्यमंत्र्यांनी याच अधिवेशनात पेन्शनचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिलेले आहे ही गोष्टही शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नांबद्दल सरकारची सकारात्मक भूमिका असल्याचे शिष्टमंडळास सांगितले.या वेळी खा.संजय धोत्रे उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मीरसाहेब,संचीव संजय खांडेकर,गजानान राऊत,रामविलास शुक्ला,मुकुंद देशमुख आदि उपस्थित होते.-