परिषदेचे कान डोळे कायम सतर्क असावेत :एस.एम.

0
517

परिषदेच्या उपक्रमांना व्यापक प़सिध्दी मिळावी यासाठी प़यत्न करा :एस.एम.देशमुख यांचे आवाहन

मुंबई :जिल्हा प़सिध्दी प़मुख हे मराठी पत्रकार परिषदेचे कान आणि डोळे आहेत, ते कायम सतर्क असले पाहिजेत.. परिषदेच्या उपक्रमांना आणि कार्यक्रमांना व्यापक प़सिध्दी मिळवून देण्य जिल्ह्यात माध्यम क्षेत्रात घडणारया प़त्येक बारिक सारिक गोष्टवरबरो नजर ठेऊन त्याचे गुप्त अहवाल परिषदेकडे पाठविण्य काम जिल्हा प़सिध्दी प्रमुखांनी करावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी केले खिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमांना आणि उपक़मांना सोशल मिडिया, प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमातून नियमित आणि व्यापक प्रसिध्दी मिळविण्यासाठी जिल्हा प़सिध्दी प़मुखांनी प़यत्न करावेत असे आवाहन ही देशमुख यांनी केले
मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प़सिध्दी प़मुखांनी पहिली बैठक आज पार पडली.या बैठकीत मार्गदर्शन करताना देशमुख म्हणाले, मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची उपक़मशील संघटना आहे.. पत्रकारांच्या हिताचे आणि हक्काचे वेगवेगळे उपक्रम परिषदेच्यावतीने राबविले जातात.. मात्र या उपक्रमांना हवी तशी प़सिध्दी मिळत नसल्याने परिषदेचे कार्य जनतेसमोर येत नाही.. ही उणीव दूर करण्यासाठी जिल्हा प़सिध्दी प्रमुखांनी जिल्हा, विभागीय पातळीवरील दैनिकातून परिषदेच्या जास्तीत जास्त बातम्या प़सिध्द होतील याची काळजी घ्यावी.. तसेच जिल्हा प़सिध्दी प्रमुखांनी परिषदेचे कान व डोळे ही भूमिका पार पाडताना आपल्या जिल्ह्यात पत्रकारांवर होणारे हल्ले, पत्रकारांचे कोरोनाने किंवा तत्सम आजाराने होणारे मृत्यू, पत्रकारांना उपचारासाठी मदतीची गरज असेल तर त्याची माहिती परिषदेकडे नियमितपणे पाठविली पाहिजे अशी सूचना त्यांनी केली..
पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो त्यासाठी सर्व पत्रकारांनी तयार राहावे असेही देशमुख यांनी जाहीर केले..
जिल्हा प़सिध्दी प्रमुख म्हणून सर्वोत्कृष्ट कार्य करणारया प़सिध्दी प्रमुखांचा पुरस्कार देऊन तालुका अध्यक्षांच्या मेळाव्यात सत्कार करण्यात येईल अशी घोषणा अध्यक्ष गजानन नाईक यांनी केली..
राज्य प़सिध्दी प्रमुख अनिल महाजन यांनी प़ास्ताविक केले.. मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी सूत्रसंचालन केले.. सरचिटणीस संजीव जोशी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.. राज्य सोशल मिडिया सेलचे प्रमुख बापुसाहेब गोरे यांनी आभार मानले..
यावेळी उपस्थितांपैकी अनेकांनी मौलिक सूचना केल्या.. प़सिध्दी प्रमुखांची दरमहा ऑनलाईन बैठक घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here