अ. भा.मराठी पत्रकार परिषदेचे आणखी एक यश*, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या ठेवीत वाढ करून सर्व पात्र पत्रकारांना पेन्शन द्यावी अशी मागणी करून मराठी पत्रकार परिषदेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती.. त्याचा सातत्यानं पाठपुरावा देखील केला होता.. त्यासंबंधीच्या बातम्या महाराष्ट्रातील बहुतेक मान्यवर दैनिकांनी प़सिध्द केल्या होत्या… मराठी पत्रकार परिषदेच्या मागणीनुसार अर्थमंत्री अजित पवार यांनी आज शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीत दहा कोटीची वाढ केली आहे.. त्यामुळे या निधीतील ठेवींची रक्कम आता 35 कोटी रूपये झाली आहे.. बॅंकांचे व्याज दर कमी झाल्याने ठेवतील रक्कम पेन्शन आणि आरोग्य निधीसाठी अपुरी पडू लागल्याने परिषदेने हा विषय हाती घेतला होता.. त्याला यश मिळाले आहे..मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्र सरकारचे मनापासून आभार..मराठी पत्रकार परिषद जो विषय हाती घेते तोपूर्ण करतेच करते हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे..