76 वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या आणि आचार्य अत्रे,न.र.फाटक,य.कृ.खाडीलकर,पा.वा.गाडगीळ,प्रभाकर पाध्ये,अनंतराव भालेराव यांच्यासारख्या दिग्गज पत्रकारांनी अध्यक्षपद भूषविलेल्या मराठी पत्रकार परिषदेची मुंबई शाखा लवकरच सुरू करण्याचे ठरले आहे.त्यासाठी सदस्य नोंदणी 16 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येत आहे अर्जाचा नमुना सीएसटी येथील परिषदेच्या कार्यालयात 16 फेब्रुवारीपासून दुपारी 12 ते 4 या वेळांत उपलब्ध करून दिला जाणार आहे.अर्जासोबत आपण ज्या वृत्तपत्रात किंवा वाहिनीत काम करतो आहोत त्याचे नियुक्तीपत्र,आणि ओळखपत्र जोडणे अत्यावश्यक आहे.तसेच दोन फोटो सोबत जोडावे लागतील.
सदस्यता शुल्क 100 रूपये आहे.ज्यांना परिषदेसारख्या वलयांकित संस्थेत काम करण्याची इच्छा आहे अशा पत्रकारांनी कृपया मराठी पत्रकार परिषद,9 हजारीमल सोमाणी मार्ग,मानवी हक्क आयोगाचे कार्यालयाच्या बाजुला,सीएसटी मुंबई येथे संपर्क साधावा. 9820784547 या मोबाईल क्रमांकावर किरण नाईक यांच्याशी संपर्क साधता येईल.अर्ज देणे आणि स्वीकारण्याची मुदत 16 फेब्रुवारी ते 8 मार्च अशी आहे.
मराठी पत्रकार परिषदेला राज्यातील 35 जिल्हा संघ आणि 342 तालुके जोडले गेलेले असून राज्यातील साडेआठ हजार पत्रकार परिषदेचे सदस्य आहेत.राज्यातील पत्रकारांची पहिली संस्था असल्याने पत्रकारांची मातृसंस्था म्हणूनच परिषदेचा उल्लेख केला जातो.