परिषदेची भूमिका..

0
986

पंच्च्याहत्तर वषार्ची देदीप्यमान परंपरा असलेल्या मराठी पत्रकार परिषदेने  दोन जिगरबाज पत्रकारांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जाहीर सन्मान करण्याचा  निर्णय  घेतला.त्याची घोषणाही केली.चांगल्या आणि प्रामाणिक हेतूनं घेतलेल्या या  निर्णयाने खरं तर वाद उभा राहण्याचं कोणतंच कारण नव्हतं.मात्र या मुद्दांवरून कारण नसताना वाद निर्माण  करून ज्याचा हा सन्मान केला जाणार होता त्याचा आनंद हिरावून घेण्याचा प्रय़त्न झालेला आहे.तो दुदैर्वी पण पाय अोढण्याच्या मराठी माणसाच्या प्रवृत्तीला सुसंगत असाच आहे.

अरूणा शानबाग यांच्या निधनानंतर अरूणाला जिवंतपणी मरणयातना भोगायला लावणाऱ्या सोहनलालबद्दल चर्चा  सुरू झाली.सकाळचे बातमीदार ज्ञानेश चव्हाण यांनी या अनुषंगानं सोहनलाल वाल्मिकीचा शोध सुरु  केला.मोठ्या कष्टानं,जोखीम उचलत,त्यांनी सोहनलालला शोधून काढलं आणि त्याचा चेहरा जगासमोर आणला.हे करताना ज्ञानेश चव्हाण यांनी दाखविलेली हिमंत,धै र्य  कौतुकास्पदच होतं.शोध पत्रकारितेचाही तो एक आदर्श नमुना होता.ज्ञानेशमुळं सोहनलाल जिवंत आहे,हे सत्य जगासमोर आलं यात शंकाच नाही.ज्ञानेशच्या या कामगिरीबद्दल त्याचं कौतूक करावं तेवढं थोडंच आहे.सोहनलालच्या शोधाचं संपूणर् श्रेय निश्चितपणे ज्ञानेशचंच आहे त्यात कोणी वाटेकरी नाही हे ही सत्य आहे.

सकाळमध्ये ही बातमी आल्यानंतर एबीपी माझाचे दिल्ली प्रतिनिधी कौस्तुभ फलटणकर यांनीही सोहलालला गाठलं आणि त्यावर स्टोरी केली.ही स्टोरी करताना त्यांनी सकाळचं किंवा ज्ञानेशचं श्रेय त्याना  दिलेलं आहेच..मात्र त्यातलं एक सत्य असंही आहे की,फाॅलअप स्टोरी का असेना ती तातडीनं एबीपी माझानं केली ही गोष्ट कौतूकाची नाही काय? ..सकाळमध्ये बातमी आल्यानंतर त्याचा फाॅलअप सकाळचं भावंड असलेल्य साम वर आला असता तर ते स्वाभाविक होतं पण तसं झालं नाही.सामनं ज्ञानेशच्या स्टोरीवर शो जरूर केला पण फाॅलोअप स्टोरी सामला करता आली नाही ती एबीपी माझानं केली.एबीपी माझाची ही स्टोरी एबीपी न्यूजनं कॅरी केली परिणामतःसोहनलाल जिवंत असल्याची माहिती देशभर कळली.त्याचा ठावठिकाणाही देशभर कळला.सकाळमुळं बातमी महाराष्ट्राला कळली तरी एबीपी माझामुळं ती देशाला कळली हे कोणी नाकारू नये..हे कामही एका मराठी तरूण पत्रकाराने केले.त्याचंही  कौतूक नक्कीच आहे.हेच काम अन्य एखादया हिंदी भाषक चॅनलनं किंवा त्याच्या रिपोटर्रनं केलं असतं तर  मराठी पत्रकारांची संस्था म्हणून मराठी पत्रकार परिषदेला त्याचं कौतूक वाटण्याचं काहीच कारण नव्हतं.  त्यामुळं दोघांचाही सत्कार करावा ही मराठी पत्रकार परिषदेची भूमिका होती आणि आहे.या संदभार्त राजीव खांडेकर असतील किंवा कौस्तुभ फलटणकर असतील यांच्याशी बोलने झाले  तेव्हा त्या दोघांनीही “ज्ञानेशचाच सत्कार करा,या बातमीचं श्रेय त्याचंच आहे” असं स्पष्ट केलं होतं.मात्र ही बातमी सोहनलालला भेटून पहिल्यांदा एबीपी माझानं लावून धरल्यानं कौस्तूूभचाही सत्कार व्हावा असं आम्हाला वाटतं असं राजीव खांडेकर यांच्याकडं स्पष्ट केलं.त्यानंतर सकाळी मराठी पत्रकार परिषदेची प्रेस नोट व्हाॅटसअॅपवर टाकली.

सत्काराची कल्पना सूचली कशी? सकाळची बातमी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी टाइम्स किंवा अन्य काही इंग्रजी दैनिकानं ही बातमी कॅरी केली.मराठी वृत्तपत्रांनी असं का केल नाही म्हणून एका पत्रकार मित्रांनी नाराजी व्यक्त करणारी पोस्ट टाकली .अन्य मराठी दैनिकांना ज्ञानेशचं कौतूक करावं असं वाटलं नसेल तर हरकत नाही तो त्यांचा व्यावसायिक भाग झाला पण आपण संघटना आहोत आपण ज्ञानेशचा सत्कार करू अशी कल्पना मी  आमच्या  मीटिंग मध्ये मांडली.ती सवार्नी मान्य केली.आमचे सरचिटणीस संतोष पवार संजय आवटेसाहेबाना  बोलले.त्यांचीही परवानगी घेतली.त्याच वेळेस एक सूचना अशीही आली की,इलेक्टाॅनिकवर ही बातमी पहिल्यांदा ज्यानं दिली तो मुलगाही मराठी पत्रकाराच आहे तेव्हा त्याचाही सत्कार करावा.त्यानंतर राजीव खांडेकर यांच्याशीही बोलणे झाले आणि नंतर अंतिम निणर्य़ झाला तो आज प्रसिध्द केला.दोन्ही पत्रकारांचं कौतूूक व्हावं एवढाच यामागं हेतू होता.

त्यानंतर बातमीचा प्रत्येकानं आपल्या कुवतीप्रमाणं,अंगाने  अर्थ  काढायला सुरूवात केली.ज्यांनी मूळ पोस्ट शांतपणे वाचली असेल त्यांना हे नक्की समजायला हरकत नाही की,ज्ञानेशचं श्रेय त्यात नाकारलेलं नाही.त्याच्या श्रेयातला वाटाही कुणाला देण्याचा प्रश्न नाही.तरीही काही मित्रांनी त्यावरून वाद निमार्ण केला.अशा वादानं घाबरून आम्ही आमची भूमिका बदलणार नव्हतो आणि नाही.कारण दोघांच्या सत्काराल विरोध कऱणारे जेवढे होते त्या्च्या पेक्षा किती तरी मित्रांनी फेसबुकवरून आमच्या भूमिकेचं समथर्न केलेलं आहे.सावर्जनिक जीवनात असे अनुभव येत असतातच.अशा स्थितीत कोणाला तरी वाटते म्हणून  मराठी पत्रकार परिषदेला आपली भूमिका बदलता येणार नाही.कारण परिषदेचा हेतू शुध्द आहे.मी असो,किरण नाईक असतील किंवा संतोष पवार असतील किंवा परिषदेचे अन्य पदाधिकाऱी यांच्या पैकी आम्ही थेट ना ज्ञानेशला अोळखतो ना कौस्तुभला.दोघांचेही फोन नंबसर् आमच्याकडं नव्हते.ते शोधून काढावे लागले.अशा स्थितीत कुुणाचं तरी नाहक कौतूक करायचं किंवा कुणाचं तरी श्रेय नाकारून ते इतरांना द्यायचं कोणतंच कारण नाही.पत्रकारांची संघटना म्हणून सकारात्मक काम करणाऱ्या पत्रकारांचं कौतूक करायचं,त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारायची आणि त्यांना कामासाठी प्रेरणा द्यायची हे काम परिषद गेली ७५ वषेर् करीत आलेली आहे.दोघांचा सत्कार याच भूमिकेतून कऱण्याचा निणर्य़ परिषदेनं घेतला.एक संघटना म्हणून परिषदेची भूमिका चुकीची आहे असं आम्हाला आत्ताही वाटत नाही.

राजीव खांडेकर असतील,कौस्तुभ फलटणकर असतील किंवा मराठी पत्रकार परिषद असेल यापैकी कोणीही ज्ञानेशचं श्रेय नाकारत नाही.दोघांचा सत्कार झाला तर श्रेय नाकारलं किंवा श्रेय विभाजन झालं असंही होत नाही.तेव्हा झाला तेवढा वाद पुरे.या विषयावर आता जास्त न ताणता ज्यांचा आम्ही सन्मान करीत आहोत त्या पत्रकारांना सत्काराची आनंद घेऊ द्या.प्लीज…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here