मराठी पत्रकार परिषदेच्या विविध पदांच्या नियुक्त्या जाहीर
मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष, आणि विभागीय सचिवांच्या घोषणा परिषदेच्यावतीने आज करण्यात आल्या आहेत. त्यानुसार परिषदेच्या कोषाध्यक्षपदी नांदेड येथील दैनिक “सामना “चे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून नागपूरचे योगेश कोरडे, सांगली येथील तरूण भारतचे ब्युरो चीफ शिवराज काटकर, नाशिक येथील पत्रकार यशवंत पवार, औरंगाबाद येथील महाराष्ट्र टाइम्सचे प्रमोद माने, परभणी येथील पत्रकार सुरेश नाईकवाडे, बुलढाणा येथील देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परिषदेचे विभागीय सचिव म्हणून पुढील प़माणे नियुक्त्या करण्यात येत आहेत.
पुणे विभाग : बापुसाहेब गोरे (पुणे);
लातूर विभाग : प्रकाश कांबळे, (नांदेड);
औरंगाबाद विभाग : विशाल साळुंखे, (बीड); नागपूर विभाग :अविनाश भांडेकर (भंडारा); नाशिक विभाग : मनसूरभाई, (नगर); अमरावती विभाग : जगदीश राठोड; कोकण विभाग : विजय मोकल (रायगड). कोल्हापूर आणि मुंबई विभागाच्या विभागीय सचिवांच्या नियुक्त्या नंतर जाहीर करण्यात येणार आहेत.
कार्यकारिणी सदस्य म्हणून अनिल वाघमारे (वडवणी), रोहिदास हाके (धुळे); महिला संघटक पदासाठी दैनिक तरूण भारतच्या रत्नागिरीच्या जान्हवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्त्या पुढील दोन वर्षांसाठी असतील. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी पत्रकार परिषदेची ही नवी टीम आपल्या कार्यकाळात परिषद अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करेल, तसेच राज्यातील पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केला आहे.