*मराठी पत्रकार परिषदेचा**द्विवार्षिक निवडणूक* *कार्यक्रम जाहीर!*मराठी पत्रकार परिषद कार्यकारिणीची बैठक 15 जुलै 2019 रोजी मराठी पत्रकार परिषद कार्यालय,मुंबई येथे घेण्यात आली. या बैठकीत मराठी पत्रकार परिषद द्विवार्षिक निवडणूक 2019-2021 कार्यक्रम खालील प्रमाणे जाहीर करण्यात आला.*● सभासद यादी कार्यालयात उपलब्ध करून देणे-*- गुरुवार दि.०१ ऑगष्ट २०१९सकाळी ११.३० ते दु.०२.३०पर्यंत. *● नामनिर्देशन(उमेदवारी) अर्ज मिळण्याची तारीख व वेळ-*- शनिवार दि.०३ते बुधवार ०७ऑगष्ट२०१९ पर्यंतसकाळी ११.३०ते दु.०२.३० पर्यंत. *● नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची तारीख व वेळ-*शनिवार दि.०३ते बुधवार ०७ ऑगष्ट २०१९ पर्यंतसकाळी ११.००ते दु.०३.३० पर्यंत. *● नामनिर्देशन अर्जाची छाननी तारीख व वेळ*बुधवार दि.०७ ऑगष्ट २०१९ रोजी.सांयकाळी ०४.००ते सांयकाळी.०६.०० पर्यंत. *● उमेदवार यादी प्रसिद्ध करणे,तारीख व वेळ-*बुधवार दि.०७ ऑगष्ट २०१९ रोजी.सांयकाळी ०७.००वाजता. *● उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख व वेळ-*गुरूवार दि.०८ऑगष्ट २०१९ रोजी.सकाळी ११.३० ते दु.०२.३०पर्यंत. *● उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे-*गुरूवार दि.०८ ऑगष्ट २०१९ रोजी.दु ०४.०० वा. *● निवडणूक घेणे आवश्यक झाल्यास ऑनलाईन मतदानाची तारीख व वेळ*-शुक्रवार दि.३०ऑगष्ट २०१९ रोजी.सकाळी ०७.०० ते सांयकाळी ०५.००पर्यंत. *● निकाल जाहीर करणे-*शुक्रवार दि.३०ऑगष्ट २०१९ रोजी होणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत निवडणूक निकाल जाहीर करण्यात येईल. *टीप-* मराठी पत्रकार परिषदेचा सदस्यच निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊ शकतो.(निवडणूक विषयक नियमावली परिषदेच्या कार्यालयात पहायला मिळेल) निवडणूक *कार्याध्यक्ष* व *सरचिटणीस* या दोन पदांसाठी होत असून उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारी अर्ज फी रु.१००/-आणि डिपॉझिट(परत न मिळणारी रक्कम)प्रत्येकी अर्ज रु.5000/एवढी रोख रक्कम स्वरूपात भरल्याशिवाय उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. *निवडणूक निर्णय अधिकारी*बापूसाहेब गोरे(पुणे)मोबाईल क्र-०९८२२२२२७७२ *सहाय्यक निवडणूक अधिकारी*अच्युत पाटील(पालघर)मोबाईल क्र.-०९४२२४८४२१८ |