वि.स.पागे प्रशिक्षण केंद्राच्यावतीनं मराठी पत्रकार परिषदेच्या सदस्यांसाठी आयोजित अभ्यास वर्गात राज्यभरातून 52 पत्रकार सहभागी झाले होते.अत्यंत नियोजनबध्द पध्दतीनं पार पडलेल्या या वर्गासाठी सहकार्य केल्याबद्दल वि.स.पागे प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने यांचे मनापासून आभार.तसेच सहभागी झालेल्या सर्व सदस्यांनाही धन्यवाद.या अभ्यास वर्गात अनेक सदस्यांनी सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती.मात्र सर्वांनाच सामावून घेणं शक्य नव्हते.त्यामुळं 52 सदस्यांची निवड केली गेली होती.उर्वरित सदस्यांसाठी पावसाळी अधिवेशनात असाच अभ्यासवर्ग आयोजित कऱण्याची योजना आहे.पुढील वर्गात आणखी पन्नास सदस्यांनी संधी मिळणार आहे.माझ्या व्यक्तीगत अडचणींमुळे मला वर्गासाठी जाता आलं नाही.मात्र किरण नाईक यांनी सारी सूत्रे हाती घेऊन अभ्यास वर्ग व्यवस्थित पार पाडला.त्याबद्दल त्यांचेही आभार.