विनम्र निवेदन
मित्रांनो,
मराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशन तसेच इतर कार्यक्रम असले की काहीतरी करून अपशकून करण्यासाठी काही नतद्रष्टांच्या विध्वंसक शक्ती सक्रीय होत असतात , त्या यावेळी ही झाल्या आहेत.
विविध कपोलकल्पित आरोप करून बुध्दीभेद करण्याचा या मंडळींचा प्रयत्न आहे. यामध्ये जसे काही ‘लुच्चे’ पत्रकार आहेत तसेच काही विविध गंभीर गुन्हे केल्याने तडीपारीची कारवाई झालेले गुन्हेगार, आणि जातीयवादी पत्रकार देखील आहेत . दररोज वेगवेगळ्या पोस्ट टाकून सभ्रंम निर्माण करण्याचं कारस्थान यामागं आहे. ही सारी मंडळी विविध स्वार्थी आणि मतलबी कारणांनी दुखावलेली असल्याने ती संस्थेवर सूड उगवायचा प्रयत्न करते आहे. मात्र होणार्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्यानं ती उघडी पडणार आहेत यात शंकाच नाही.
ताजी पोस्ट ही परिषदेमध्ये आर्थिक गोंधळ असल्याबद्दलची आहे. या निवेदनाव्दारे
मी स्पष्ट करू इच्छितो की, परिषदेचा आर्थिक व्यवहार अत्यंत चोख आणि पारदर्शक आहे. परिषदेचे ऑडिट देखील नियमितपणे केले जाते. परिषदेचा सारा कारभार केवळ जिल्हा संघांकडून येणार्या वर्गणीवरच चालतो. त्यामुळं फार उलाढाल नसतेच. गेल्या दोन वर्षात कोणाकडूनही कवडीचीही देणगी घेतलेली नाही. काही वर्षापूर्वी तीन दात्यांनी देणगी पोटी तीन लाख रूपये दिले होते. त्यातून भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार, प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार आणि दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार दिला जातो. परिषदेने पुरस्कार सुरू करावेत यासाठीच या देणग्या होत्या आणि त्यानुसार नियमित पुरस्कार दिले जातात. यंदाचा सोहळा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि मा,नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपुरात पार पडला. त्या अगोदर ठाण्यात मा.उध्दव ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार वितऱण सोहळा पार पडला होता. या व्यतिरिक्त परिषदेला कोणीही देणगी दिलेली नाही. परिषदेने ती घेतलेली नाही. त्यामुळं परिषदेला भरपूर देणग्या मिळतात हा जावईशोध या गणंगांनी कोठून आणि कसा लावला माहिती नाही.
पुणे येथिल एका सीए फर्मकडून नियमित ऑडीट करून घेतले जाते.. त्यासंबधी चार्टर्ड अकौन्टंट फर्मचे पत्रही आणि ऑडीट रिपोर्ट परिषदेच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. . शिवाय हे हिशोब प्रत्येक अधिवेशनात होणार्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सादरही केले जातात. ज्यां सदस्यांना हे हिशोब पाहायचे आहेत त्यांच्यासाठी ते शेगाव अधिवेशनात उपलब्ध करून दिले जातील. धर्मदाय आयुक्तांकडं काही विषय प्रलंबित असल्यानं त्यांच्याकडून माहितीच्या अधिकारात ते पत्र दिलेले असू शकते. त्यामुळं अधिवेशनाच्या काळात जाणीवपूर्वक 80 वर्षाच्या संंस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय तो हाणून पाडला पाहिजे. मा. मुख्यमंत्र्यांच्या नावानं चार ओळीचं पत्र पाठविलं म्हणजे आरोप खरे आहेत असं होत नाही. प्रचार करण्यापुरतं ते ठीकय पण आरोप कोण करतोय याचीही दखल लोक घेत असतात. ज्यांच्यावर तडीपारीची कारवाई झालेली आहे अशा आणि ज्यांच्यावर दंगली घडविणे,जातीयवाद पसरविणे आदि गंभीर आरोप आहेत अशा कथित पत्रकाराच्या पत्रावरून सरकार परिषदेच्या कारभाराची चौकशी करणार असेल तर आमची त्यासाठी सर्व सहकार्य करण्याची तयारी आहे.
आपले नेतृत्व एवढे पारदर्शक आणि स्वच्छ आहे की, जेथे एस. एम. देशमुख आहेत तेथे भ्रष्टाचाराला थारा नाही हे राज्यातील सर्व पत्रकारांना माहिती आहे. तरी ज्यांच्यावर तडीपारीची कारवाई झालेली आहे , ज्यांच्यावर दंगली घडविणे, जातीयवाद पसरविणे आदि गंभीर आरोप आहेत अशा स्वार्थी आणि मतलबी लोकांच्या रिकामटेकदया पोस्ट ने विचलित होण्याचे कोणते कारण नाही. धन्यवाद.
मिलिंद सिताराम अष्टीवकर,
कोषाध्यक्ष
मराठी पत्रकार परिषद मुंबई
Cell 9422071100