परभणीचे पत्रकार लई भारी

0
596

[24/06, 4:08 pm] Kamlesh Thakur, Pen Raigad Prasadhipramukh: अधिकाऱ्यांना फैलावर घेत पत्रकारांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश…..

परभणी प्रतिनिधी-
माहिती कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना चांगल्या वर्तणुकीची समज देत तसेच अधिकाऱ्यांना फैलावर घेत पत्रकारांचे प्रलंबित राहिलेले सर्व प्रश्न त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गुरुवार 24 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व पत्रकार यांच्या घेतलेल्या बैठकीत दिले..
परभणी जिल्हा माहिती कार्यालयात मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील पत्रकारांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत होते. याकरिता परभणी शहरातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना बुधवार 23 जून रोजी निवेदन दिले .याची दखल घेत तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवार 24 जून रोजी पत्रकारांसोबत बैठक घेतली यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर , प्रवीण भाने गावकर याची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांचे सर्व प्रश्न ऐकून घेत जिल्हा माहिती अधिकारी यांना आठवड्यातून दोन दिवस परभणी येथील कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देत .माहिती अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना चांगली समज देण्याचे तसेच पत्रकारांची आजपर्यंतचे प्रलंबित राहिलेले सर्व प्रश्न .तसेच जिल्ह्यातील पत्रकारांचे अधिस्वीकृती प्रकरने पेन्शन प्रस्ताव ,आरोग्यविषयक प्रस्ताव मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले .यावेळी पत्रकार प्रा. सुरेश नाईकवाडे, सुरज कदम ,प्रवीण देशपांडे, लक्ष्मण मानोलीकर, हनुमंत चिटणीस, श्रीकांत देशमुख, राजकुमार हट्टेकर , सुरेंद्र पाथरीकर, अनिल दाभाडकर, मोईन खान अॅड्. रमेश गोळेगावकर, शेख इफतेखार, मंदार कुलकर्णी, वाकळे माणिक रासवे,मंचक खंदारे, यांसह आदी पत्रकारांची उपस्थिती होती..
[24/06, 5:23 pm] Anil Bhole: 👍👍

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here