पनवेल सीएसटी रेल्वे मार्गावर आजपासून बारा डब्याची लोकल धावणार आहे.या गाडीला पहिल्या वर्गासाठी तीन बोगी,महिलांसाठी तीन बोगींची व्यवस्था असणार आहे.पनवेल ते सीएसटी मार्गावर होणारी प्रवाश्यांची गर्दी टाळण्यासाठी या मार्गावर बारा डब्याची गाडी सुरू करावी अशी मागणी गेली अनेक दिवस प्रवासी संघातर्फे केली जात होती.ती आज पूर्ण होत आहे.आज दुपारी 11.30 वाजता येणार्या पहिल्या बारा डब्याच्या लोकलचे स्वागत पनवेल स्थानकात केले जाणार असल्याची माहिती प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ.भक्तीकुमार दवे यांनी दिली.-
(Visited 59 time, 1 visit today)