महिला पत्रकारावर हल्ला

0
882

पनवेल येथील कर्नाळा टीव्हीच्या रिपोर्टट चेतना वावेकर यांच्यावर आज सकाळी पनवेल येथे प्राणघातक हल्ला कऱण्यात आला.वावेकर आपल्या गाडीतून कामावर जात असताना एक तरूण गाडीला आडवा आला.त्याने चेतना वावेकर यांच्या केशाला धरून त्यांना बाहेर काढले.अश्लिल शिव्या देत त्यांना मारायला सुरूवात केली.तेवढ्यात मारहाण कऱणाऱ्या तरूणाचा मित्र आला त्याने मग बाबूच्या काठीने वावेकर यांच्या डोक्यावर वार केले आहेत.त्यात वावेकर ंगभीर जखमी झाल्याअसून त्यांच्यावर उपचार कऱण्यात येत आहेत.वावेकर यांनी खांदेश्वर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.मारहाण करणारे तरूण पनवेल नजिकच्या आकुर्ली गावचे रहिवाशी असून हा हल्ला कशामुळे झाला ते अद्याप स्पष्ठ झालेले नाही.कर्नाळा टीव्ही शेकापचे नेते विवेक पाटील यांच्यावतीने चालविला जातो.
चेनता वावेकर यांच्यावरील हल्ल्याचा रायगड प्रेस क्लब तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने तीव्र शब्दात धिक्कार केला असून तातडीने आरोपींना अटक करावी अशी मागणी केली आहे.

अपडेट – आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार आरोपींच्या विरोधात पोलिसानी 354,341,332,324,325,326 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.गंमत म्हणजे वावेकर यांच्यावर हल्ला केल्यानंतर आपण अडचणीत येणार हे लक्षात येताच हल्लेखोर राजेश ठाकूर तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आला असता पोलिसानी त्याला तेथेच बसवून ठेवले आहे.दुसरा आरोपी चंद्रकांत पाटील अजून फरार असून पोलिसांनी त्याला लवकर अटक केली नाही तर शहरातील सर्व पत्रकार आंदोलन करतील असा इशारा पत्रकारानी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here