पनवेल पं. स. अभिनव उपक्रम

0
858

अलिबाग- सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उरण तालुक्यातील बांधपाडा हे गाव दत्तक घेतलेले असतानाच त्यापासून प्रेरणा घेत आता पनवेल तालुका पंचायत समितीच्या सदस्यांनी आपल्या क्षेत्रातील वीस गावं दत्तक घेऊन त्याचा विकास कऱण्याचा संकल्प सोडला आहे.पंचायत समिती सदस्यांनी गावं दत्तक घेऊन त्याचा विकास कऱण्याची योजना आखण्याचा ही राज्यातील पहिलीच घटना आहे.
पनवेल तालुका मुंबईच्या जवळ असला तरी विकासाची गंगा तालुक्यातील अनेक गावांपर्यत पोहोचलेलीच नाही.शिक्षणाकडंही व्यवस्थेचं दुर्लक्ष होत असल्याने जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा पटसंख्ये अभावी बंद पडत आहेत.ही स्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक सदस्यांनी एक शाळा दत्तक घेऊन तिची स्थिती सुधारावी अशी कल्पना प्रथम पुढं आली.ती योजना सुरूही झाली पण नंतर प्रत्येक सदस्यानंी एक गाव दत्तक घेऊन त्या गावाचा विकास करावा असा विचार पुढं आला.मग लगेच त्याची अंमलबजावणीही केली गेली.त्यानुसार वीस सदस्यांनी वीस गावं दत्तक घेतली आहेत. दत्तक घेतलेल्या गावात पालक सदस्य स्वच्छता,आरोग्य ,शिक्षणबरोबर रस्ते , वीज आदि पायाभूत सुविधा गावाला मिळाव्यात यासाठी विशेष प्रयत्न करतील.गट विकास अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या या अभिनव कल्पनेमुळे पनवेल तालुक्यातील वीस गावांचा नजिकच्या काळात चेहरा-मोहराच बदलून जाईल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here