राज्यात वेगवेगळ्या माफियांचा धुमाकुळ सुरू आहे.रेती माफिया,भू माफिया,गुटखा माफियाचा सुळसुळाट दिसतो आहे.यांच्याविरोधात आवाज काढणार्या पत्रकारांना खुलेआप जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.मिरज येथील दैनिक पुढारीचे पत्रकार आणि सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जालिंदर हुलवान यांना आज एका अज्ञात व्यक्तीनं फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली.जालंदर हुलवान .आरग येथील बनावट गुटखाच्या विरोधात पुढारीमधून लेखमाला चालविली होती.त्याचा राग मनात धरून अज्ञात व्यक्तीने लॅन्डलाईनवरून धमकी दिली आहे.हुलवान यांनी याबाबतची तक्रार पोलिसात दिली असून पोलीस नंबर कोणाचा आहे याची चौकशी करीत आहेत.या धमकीचा मराठी पत्रकार परिषद तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने निषेध केला आहे यात गंमत अशी की,धमकीच्या फोन बाबतची तक्रार दाखल होऊन चार तास उलटले असले तरी अद्यापही फोन कोणाचा आहे याचा पत्ता पोलिसांना लागत नाही यावरून पाणी कुठं मुरतंय याचा अंदाज येऊ शकतो.