2 नोव्हेंबर रोजी जागतिक पत्रकार हल्ला विरोधी दिन साजरा होत आहे.. जगभर पत्रकारांवर हल्ले होत आहेत, पत्रकारांच्या हत्त्या होत आहेत आणि माध्यम स्वातंत्र्याची सर्रास गळचेपी होताना आपण बघतोय.. .. पाकिस्तान, अफगाणिस्तान इराक सारख्या मागास देशात जसे हे हल्ले होतात तद्वतच अमेरिका, इंग्लंड सारख्या तथाकथित पुढारलेल्या देशातही पत्रकारांवर हल्ले होतात.. भारतातही पत्रकारांवर होणारया हल्ल्यांची संख्या चिंता वाटावी एवढी मोठी आहे.. मात्र या विषयावर युनायटेड नेशन सह कोणीच गंभीर नाही..पत्रकारांवर होणारे हल्ले आणि माध्यम स्वातंत्र्याची होणारी गळचेपी याविरोधात जागतिक स्तरावर एखादी मोहिम राबविली जात आहे असंही दिसत नाही.. त्यामुळे पत्रकार हल्ला विरोधी दिन साजरे करण्याच्या सोपस्कारांना माझ्या लेखी काही अर्थ नाही.. हे सारं वांझोटे आहे..एक दिवस गळे काढून काही होत नाही.. पत्रकारांवरील हल्ले थांबवावेत यासाठी जागतिक समुदायाने ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.. असे झाले तर पत्रकार हल्ला विरोधी दिनाचे काही औचित्य उरेल…