सीवान,१५ मे, : बिहारच्या सिवानमधील पत्रकार राजदेव रंजन यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका स्थानिक अभियंत्याला अटक केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,खूनाचा प्रकार घडला त्या दिवसाचे सीसीटीव्ही चित्रिकरण नष्ट केल्याच्या आरोपाखाली अभियंता राधेश्यामला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.पोलिसांनी शनिवारी या प्रकरणी उपेंद्र सिंग आणि शहजाद यांना ताब्यात घतले होते.त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मृत पत्रकार आणि आरोपी हे एकाच मुलीवर प्रेम करत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या प्रेमप्रकरणातूनच त्यांचा खून झाल्याचे सांगण्यात येत आहे.