अभ्यासासाठी विरोधकांकडं पाठविला.
पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून तो माहितीसाठी विरोधी पक्षांकडे पाठविण्यात आल्याची माहिती मिळते आहे.खरं म्हणजे मसुदा अगोदर पत्रकार संघटनांना दाखविला जाईल असं आश्वासन मुख्यमत्री देवेद्र फडणवीस यांनी दिलं होतं मात्र पत्रकार संघटनांना अजून तरी कायद्याच्या मसुदा दिला गेला नाही.त्यामुळेच कायद्याच्या मसुद्याबाबत पत्रकार संघटनांच्या मनात संशय निर्माण झालेला आहे.कायद्याचं बिल सभागृहात मांडण्यापुर्वी ड्राफ्टविषयी सरकारनं पत्रकार संघटनांशी चर्चा करावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने एका पत्राव्दारे सरकारकडं केली आहे. –