खा.राजीव सातव लोकसभेत प्रश्न उपस्थित करणार
पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्रात झाली असली तरी तो केंद्र सरकारनं मंजूर करून तो देशभर अंमलात यावा अशी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषदेची मागणी राहिलेली आहे.त्यादृष्टीने सातत्यानं प्रयत्नही केले जात आहे.देशभरात पत्रकारांवरील हल्ल्यांची संख्या मोठया प्रमाणात वाढलेली असल्याने या कायद्याची गरजे देशात सर्वत्र आहे.यासाठीच हिंगोली येथील कॉग्रे्रसचे खासदार राजीव सातव 377 कलमानुसार हा मुद्दा लोकसभेत उपस्थित करीत आहेत.लोकशाहीचा महत्वाचा आधारस्तंभ असलेला पत्रकार आर्थिकदृष्टया आणि सामाजिकदृष्टया सक्षम असल्याशिवाय तो निर्धाराने काम करू शकणार नाही,राजीव सातव 377 च्या नोटिशीव्दारे हाच मुद्दा मांडणार आहेत.देशातील पत्रकारांसाठी जिव्हाळ्याचा असलेला हा विषय तरूण ,तडफदार खासदार राजीव सातव उपस्थित करीत असल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार..-