पत्रकार संरक्षण कायदाः समज,गैरसमज आणि वास्तव

0
1314

7 एप्रिल 2017 रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पत्रकार संरक्षण कायदा एकमतानं संमत झाला.बारा वर्षांच्या पत्रकारांच्या लढाईचा गोड शेवट झाला.त्यानंतर कायदा न वाचताच या कायद्याबद्दल गैरसमज निर्माण करायला सुरूवात झाली.कायदा वांझोटाच आहे,कायदा केवळ अधिस्वीकृतीधारकांसाठीच आहे,सर्व पत्रकारांना हा कायदा संरक्षण देत नाही..एक ना अनेक शंका उपस्थित करून या कायद्याचं महत्व कमी करण्याचा खेळ आपल्याच काही पत्रकार मित्रांनी सुरू केला.कायदा झाला तरी पत्रकारांवरील हल्ले सुरूच आहेत असेंही तारे तोडले जात आहेत.असे तारे तोडणारे हे विसरतात की,खून केल्यानंतर फाशी किंवा जन्मठेप होऊ शकते हे माहिती असतानाही खून होतच असतात.तेव्हा हल्ले शँभऱ टक्के थांबणार नाहीतच पण वचक निर्माण होणार आहे.काय आहे हा कायदा,?याचं संरक्षण कोणाला मिळू शकतं.?कोणती शिक्षा होऊ शकते ?याबाबतच्या सर्व शंकांचं समाधान करणारा विशेष कार्यक्रम पत्रकार संरक्षण कायदाः समज,गैरसमज आणि वास्तव ः यामध्ये सहभागी होत आहेत ज्यांनी पत्रकार संरक्षण कायद्यासाठी लढल्या गेलेल्या लढ्याचं नेतृत्व केलं ते स्वतः एस.एम.देशमुख आणि मुंबई उच्च न्यायालायतील ज्येष्ठ वकील जयेश वाणी– प्रत्येक पत्रकारांनी थांबलंच पाहिजे अशी खुली चर्चा.

दिनांक 20 ऑगस्ट 2017

वेळः दुपारी 2 ते 3.15

(Visited 223 time, 1 visit today)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here