पुणे जिल्हा आणि पुणे महानगर पत्रकार संघांच्या निवडणुका जाहीर
पत्रकार संघाची ऑनलाईन निवडणूक
पुणे जिल्हा पत्रकार संघ आणि पुणे महानगर पत्रकार संघाचा व्दैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून प्रथमच या दोन्ही संघाची निवडणूक प्रक्रिया ऑनलाईन पार पाडली जाणार आहे.म्हणजे ज्यांनी आपले फोन नंबर्स नोंदविले आहेत अशा सदस्यांना मोबाईलवरून आपल्या आवडीच्या उमेदवारास घरबसल्या मतदान करता येईल.अशा पध्दतीचा प्रयोग करणारी मराठी पत्रकार परिषद ही देशातील पहिली आणि एकमेव पत्रकार संघटना ठरली आहे.
द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम – सन 2017-19
प्रथमच होणार आँनलाईन निवडणूक
पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या शनिवार दि. 16 सप्टें. 2017 रोजी झालेल्या मासिक सभेत जिल्हा पत्रकार संघाची निवडणूक घेण्याबाबतचा ठराव झाला आहे. त्यानुसार खालील प्रमाणे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
1) सभासद नोंदणी ः 21 सप्टें. 2017 सकाळी 10.00 वा. पासून 5 आँक्टो. 2017 सायं. 5.00 पर्यंत
2) सभासद अर्ज छानणी ः 6 व 7 आँक्टो. 2017
3) मतदार यादी जाहीर करणे ः 9 आँक्टो. 2017 सायं. 5.00 वा.
4) उमेदवारी अर्ज वाटप व स्विकारणे ः 10 व 11 आँक्टो. 2017
5) उमेदवारी अर्ज छानणी ः 12 आँक्टो. 2017
6) उमेदवारी अर्ज माघार ः 13 आँक्टो. सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 वा. पर्यंत.
7) उमेदवारी जाहीर करणे ः 13 आँक्टो. दुपारी 4.00 वा.
8) मतदान ः रविवार दि. 29 आँक्टो. सकाळी 10.00 ते 3.00 वा. पर्यंत
9) मत मोजणी ः रविवार दि. 29 आँक्टो. दुपारी 3.00 ते 4.00 वा.
10) निवडणूक निकाल ः रविवार दि. 29 आँक्टो. दुपारी 4.00 वा.
कृष्णकांत कोबल
अध्यक्ष
पुणे जिल्हा पत्रकार संघ
(टीप ः नागपूर येथे झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत राज्यातील महानगर पत्रकार संघांना थेट मराठी पत्रकार परिषदेशी जोडून घेण्याचा निर्णय झालेला आहे. 1 सप्टेंबर 2017 पासून राज्यातील महापालिका क्षेत्रातील शहर पत्रकार संघ थेट परिषदेशी जोडले गेले आहेत. या निर्णयामुळे आता पुणे महानगर पत्रकार संघ थेट परिषदेशी जोडला गेलेला आहे. तव्दतच पिंपरी-चिंचवड महानगर पत्रकार संघही यापुढे थेट परिषदेला जोडला गेलेला आहे. त्यामुळे या दोन्हीही संघांना जिल्हा पत्रकार संघाच्या निवडणूकीत मतदाता अथवा उमेदवार म्हणून सहभागी होता येणार नाही.
पुणे महानगर पत्रकार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर*
*प्रथमच होणार ऑनलाईन पध्दतीने निवडणूक *
नागपूर येथे झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत राज्यातील महानगर पत्रकार संघांना थेट मराठी पत्रकार परिषदेशी जोडून घेण्याचा निर्णय झालेला आहे.तशी घोषणा शेगाव येथील अधिवेशनात करण्यात आली आहे.त्यामुळं 1 सप्टेंबरपासून राज्यातील ज्या शहरात महापालिका आहेत तेथील पत्रकार संघ थेट परिषदेशी जोडले गेले आहेत.हे पत्रकार संघ आता जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न नसले तरी या दोन्ही संघांनी परस्पर पूरक काम करावे अशी अपेक्षा आहे.परिषदेचा विस्तार व्हावा,परिषदेचे काम वाढावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयामुळे आता पुणे महानगर पत्रकार संघ थेट परिषदेशी जोडला गेलेला आहे.तव्दतच पिंपरी-चिंचवड महानगर पत्रकार संघही यापुढे थेट परिषदेला जोडला गेलेला आहे.
महानगर पत्रकार संघ परिषदेशी जोडले जाण्याअगोदरच पुणे शहर पत्रकार संघांची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय पुणे जिल्हा पत्रकार संघाने घेतलेला होता.त्या संदर्भातले अपिल मराठी पत्रकार परिषदेकडे कऱण्यात आले होते.मात्र परिषदेच्या 25 जुलै रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत जिल्हा पत्रकार संघाचा निर्णय कायम ठेवण्याचा निर्णय झाल्याने पुणे शहर पत्रकार संघांची कार्यकारिणी आता अस्तित्वात नाही.त्यामुळं येथे नव्याने निवडणुका घेण्याचा निर्णय जिल्हा संघ आणि परिषदेच्या 16 सप्टेंबर रोजी पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.त्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर कऱण्यात येत आहे.कार्यकारिणी बरखास्त झालेली असल्याने यावेळेस अध्यक्षांसह, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष अशा पाच पदांसाठी निवडणुका होतील. नवे पदाधिकारी परिषदेच्या सल्ल्यानुसार कार्यकारिणीची सात पदे निवडतील. त्यातील एकजण परिषद प्रतिनिधी म्हणून नियुक्त केला जाईल. एक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केला जाईल. तसेच निवडणुका निःपक्ष वातावरणात पार पडाव्यात यासाठी परिषदेकडून एक निरिक्षक पाठविला जाईल.
या कार्यक्रमासाठी 5 जणांची अस्थायी समिती नेमण्यात आली आहे. समितीतील कोणालाही निवडणूकीत उमेदवार म्हणून भाग घेता येणार नाही. किंवा कोणा उमेदवाराच्या बाजूने प्रचार करता येणार नाही. सभासद नोंदणीसाठी खालील सदस्यांशी संपर्क करावा. यापुर्वी सदस्य झालेल्या सदस्यांना देखील वार्षिक वर्गणी भरून सदस्य व्हावे लागेल.निवडणुका प्रथमच ऑनलाईन पध्दतीनं होत असल्यानं सर्व मतदारांना फोन नंबर्स नोंदविणे आवश्यक आहे.सभासद अर्ज अस्थायी समितीच्या सदस्यांकडं उपलब्ध करून दिले जात आहेत. वर्गणी भरल्यानंतर त्याची रितसर पावती घेतली जावी.निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याचे ठिकाण जाहीर कऱण्यात येईल.
*अस्थायी समिती सदस्य ः *
1) बाबासाहेब तारे : 9420162728
2) सुनील वाळुंज ः 9822195297
3) दिगम्बर माने :9970032511
4) जितेंद्र मैड ः 9960369199
5) रामचंद्र कुंभार : 9665108492
निवडणूक कार्यक्रम
1) *सभासद नोंदणी व अर्ज विक्री ः*
21 सप्टें. 2017 सकाळी 10.00 वा. पासून 29 सप्टें. 2017 सायं. 5.00 पर्यंत
2) *सभासद अर्ज छानणी ः*
3 आॅक्टो. 2017
3) *मतदार यादी जाहीर करणे ः*
4 आॅक्टो. 2017 सकाळी 11.00 वा.
4) *उमेदवारी अर्ज वाटप व स्विकारणे ः* 5 व 6 आॅक्टो. 2017
5) *उमेदवारी अर्ज छानणी ः*
7 आॅक्टो. 2017 सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वा. पर्यंत.
6) *उमेदवारी अर्ज माघार ः*
7 आॅक्टो. दुपारी 1 ते सायं. 5 वा. पर्यंत.
7) *उमेदवार अंतिम यादी जाहीर करणे ः* 7 आॅक्टो. सायं 5.30 वा.
8) *मतदान ः*
रविवार दि. 15 सकाळी 10.00 ते 3.00 वा. पर्यंत
9) *मत मोजणी ः*
रविवार दि. 15 दुपारी 3.00 वा.
10) *निवडणूक निकाल ः*
रविवार दि. 15 दुपारी 4.00 वा.
*अध्यक्ष*
*मराठी पत्रकार परिषद*