जून-जुलै हा महिना राज्यातील विविध पत्रकार संघटनांच्या निवडणुकांमुळे गाजत असतो.पुणे श्रमिक पत्रकार संघाची निवडणूक ७ जून रोजी संपन्न झाली.त्यात जितेंद्र अष्टेकर यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या घटनेनुसार ७ तारखेलाच बापूसाहेब गोरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.त्यांच्या कायर्कारिणीची निवडणूक येत्या काही दिवसात होणार आहे.मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक सध्या मुंबईत गाजतेय.कुमार कदम आणि देवदास मटालेंच्या प्रस्थापित गटाला शह देत शशिकांत सांडभोर यांनी दंड थोपटले आहेत,त्यामुळे प्रस्थापित गटाच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.आपले पॅनल घवघवीत मतांनी विजयी होणार आणि प्रस्थापितांची सत्ता संपुष्टात येणार असा विश्वास सांडभोर यांना आहे.येत्या २७ ला मुंबई मराठी पत्रकार संघाचे चित्र स्पष्ट होणार आहे.देवदास मटाले सलग दोन वेळा अध्यक्ष झाले होते .
मराठी पत्रकार परिषदेची निवडणूक कायर्क्रमही लवकरच जाहीर होत आहे.३१ आॅगस्ट पूवीर् नवीन पदाधिकाऱ्यांनी सूत्रे हाती घेतली पाहिजेत.परिषद राज्यभर विस्तारलेली असल्याने महाराष्ट्र हा परिषदेचा मतदार संघ असतो.मतपत्रिका पो्स्टानं पाठविल्या जातात.मतदार सदस्यांनी मतपत्रिकेवर मत नोंदवून त्या परत परिषदेच्या कायार्लयात पाठवायच्या असतात.परिषदेच्या निवडणुका दर दोन वषार्ंनी होतात.
विधिमंडळ वातार्हर संघाच्या निवडणुकाही जानेवारीत सपन्न झाल्या.त्यांच्या निवडणुका दरवषीर् होत असतात.निवडणुकांमुळे पत्रकार संघटनांचे वातावरण राजकारणमय झाले आहे.पत्रकार