पत्रकार विनोद यादव यांना हातपाय तोडण्याच्या धमक्या

0
949

झी-24 तासवरील लाइव्ह शोमधून समाजहिताची भूमिका मांडली म्हणून झी-24 तासचे संपादक डॉ.उदय निरगुडकर यांना डॉक्टरांनी धमक्या दिल्याचं उदाहरण समोर असतानाच दैनिक भास्कर मधील पत्रकार विनोद यादव यांनाही हातपाय तोडण्याची धमकी दिली गेली आहे.पत्रकार परिषदेत अडचणीचा प्रश्‍न विचारला म्हणून ही धमकी दिली गेली आहे.घटना अशी आहे.युवक कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा बरार यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद आयोजित केली होती.या पत्रकार परिषदेच विनोद यादव यांनी,मनपा निवडणुकीत पक्ष विरोधी कारवाई करणार्‍यांवर काय कारवाई करणार असा प्रश्‍न विचारला होता. तो प्रश्‍न युवक कॉग्रसेच्या एका पदाधिकार्‍याला असा काही झोंबला  की,त्यांनी विनोद यादव यांना असा प्रश्‍न का विचारलात अशी विचारणा करीत हातपाय तोडण्याची धमकी दिली.यादव यांनी विलेपार्ले पोलिसात याची तक्रार दिली असली तरी केवळ एनसी दाखल केली गेली आहे.आम्ही सांगू तेच टीव्हीवरूनन बोला,पत्रकार परिषदेतही सोयीचेच प्रश्‍न विचारा नाही तर आम्ही बघून घेऊ अशा धमक्या सातत्यानं दिल्या जात असून सरकार यासर्वाकडे मुकपणे बघत आहे.पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी होत असतानाही सरकार त्यावर काहीच निर्णय घेत नसल्यानं असे प्रकार वाढले आहेत.उदय निरगुडकर आणि विनोद यादव यांना दिलेल्या धमक्यांचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निषेध करीत आहे.या संदर्भात समितीचे शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून त्यांच्याकडं आपल्या तीव्र भावना व्यक्त कऱणार आहे.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here