एबीपी माझाच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांच्या बाबतीत आज घडलेली घटना जेवढी संतापजनक तेवढीच निषेधार्ह आह,पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषद या घटनेचा स्पष्ट शब्दात निषेध करीत आहे.
सरकारनं गोवंश बंदीचा कायदा केल्यानं स्वामी नारायण मंदिरात मुख्यमंत्री देवेद्रं फडणवीस यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला होता.या कार्यक्रमसाठी पहिल्या तीन रांगा पत्रकारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या.त्यानुसार पहिल्या रांगेत एबीपी माझाच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक बसल्या होत्या.मात्र त्या पत्रकार असल्या तरी महिला असल्यानं त्यांना पहिल्या रांगेत बसता येणार नाही असं आयोजकांच्यावतीनं त्यांना सांगण्यात आलं.महिलाच्या बाबतीतली ही भावना चीड आणणारी आणि निषेधार्ह आहे.थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यख्रमात महिलांना अशी वागणूक मिळत असेल तर हे आणखी गंभीर आहे.या घटनेचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषद तीव्र शब्दात धिक्कार करीत असून आयोजकांनी चुकीचे खुलासे करण्यापेक्षा रश्मी पुराणिक आणि तमाम महिलावर्गाची माफी मागावी अशी मागणी करीत आहे.