माध्यमकर्मी मानव नव्हेत ते दानव आहेत असे तारे तोडले आहेत छत्तीसगढच्या मंत्री रमशिला साहू आणि आरोग्य मंत्री अमर अग्रवाल यांनी.दुर्गमध्ये काविळीची जोरात साथ सुरू आहे.त्याची पाहणी कऱण्यासाठी मंत्री साहू आल्या होत्या.पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे त्या चिडल्या आणि पत्रकार मानव नसून दानव आहेत असे तारे त्यंानी तोडले.
दुसरीक डे आंबेडकर हॉस्पिटलमध्ये आरोग्य मंत्री अग्रवाल यांनीही पत्रकारांशी असभ्य वर्तीन केले.रायपूर प्रेस क्लब तसेच राज्यातील पत्रकार संघटनांनी दोन्ही मंत्र्यांचा निषेध केला आहे.