पुणे- पुणे सकाळचे वृत्तसंपादक माधव गोखले यांचे वडिल मुकुंद आर,गोखले यांचे आज निधन झाले.ते 79 वर्षांचे होते.काही दिवसांपासून त्यांची प्रकृत्ती ठीक नव्हती .त्याचं पार्थिव उद्या रूग्णालयाला दान क रण्यात येणार आहे.त्यांचं पार्थिव अत्यंदर्शनासाठी उद्या सकाळी 10 वाजता त्यांच्या वारजे येथील घरी ठेवण्यात येणार आहे.मुकुंद गोखले यांच्या निधनाबद्दल पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख, मराठी पत्रकार परिषधेचे उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शदर पाबळे,तसेच पुणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र कापसे यांनी दुःख व्यक्त केले आहे.