पत्रकाराला जागल्याची उपमा दिली जाते.पनवेलमधील एका तरूण पत्रकाराने खरोखरच जागल्याची भूमिका पार पाडत पत्रकारितेचा धर्म पाळला.पत्रकाराचे नाव आहे मयूर तांबडे.घटना पनवेल स्थानकातली आहे.शुक्रवारी दुपारी काही व्यक्ती एका इसमाला मारहाण करीत गाडीत कोंबण्याचा प्रयत्न करीत होते.तो इसम गाडीत बसायला तयार नव्हता.हा प्रकार पंधरा वीस मिनिटे चालला होता.अनेक जण तटस्थपणे हे सारं पाहात होते.मयूर तांबडेनं हे थांबविण्याचा प्रयत्न केला पण अखेरीस त्या व्यक्तीस गाडीत कोंबून आरोपी पसार होण्याचा बेतात असतानाच तांबडेनं आयटीआयसमोर रस्त्याच्या मधोमध गाडी लावून आरोपींची गाडी अजविवण्याचा प्रय़त्न केला.परंतू ते पसार होण्यास यशस्वी झाले.मयूरनं मग ही घटना पोलिसांना कळविली.पनवेल पोलिसांनी तातडीने नाकेबंदी केली.अखेरीस एमएच-11 एच.9009 क्रमांकाची ही स्कॉर्पिओ पोलादपूर पोलिसांनी पकडली.आणि बंडा भालेकर,अनिल चव्हाण,विश्वनाथ चव्हाण,तुकाराम कांबळे या चौकडीला पोलिसांनी ताब्यात घेतले.आर्थिक देवाण घेवाणीतून ही मारहाण आणि अपहरण केलं गेल्याचं समजतं.ज्याचं अपहराण क रण्याचा प्रयत्न झाला त्याचं नाव कानाराम तेजाराम परमार असं आहे.
एका तरूण पत्रकाराने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता एका इसमानचे प्राण वाचविले.पोलिसांनीही मयुरच्या जागरूकतेचं अभिनंदन केलं आहे.मयुरने दाखविलेले धाडस नक्कीच कौतूकास्पद आहे.मयुरच्या धाडसामुळे एका व्यक्तीचे अपहरण आणि प्राणहीवाचले.मयुरचे मराठी पत्रकार परिषद,रायगड प्रेस क्लब तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे मनःपूर्वक अभिनंदन