पुणे- पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आणि लोणावळा येथील आमचे पत्रकार मित्र प्रवीण कदम यांचे काल मध्यरात्री ह्रदयविकाराने निधन झाले.ते अवघे 46 वर्षांचे होते.त्यांच्यावर आज दुपारी 1 वाजता लोणावळा येथे अत्यंसस्कार कऱण्यात येणार आहेत.पुणे जिल्हा पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी तसेच मी अंत्यंयात्रेसाठी निघालो आहोत.
दोन दिवसांपुर्वीच प्रवीणचा फोन आला होता.त्या अगोदर पंधरा दिवसांपुर्वी पुण्यात झालेल्या पत्रकार संघाच्या बैठकीस ते उपस्थित होते.यावेळी त्यांनी पत्रकार संघाची वाटचाल कशी असावी यावर भाषणही केेले होते.लोणावळ्यातील विविध सामाजिक संस्थांशी संबंधित असलेल्या प्रवीणच्या निधनाने त्यांच्या मित्र परिवारावर आघात झाला आहे.मराठी पत्रकार परिषद,पुणे जिल्हा पत्रकार संघ तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने कदम यांना भावपूर्ण श्रध्दांजली.