पत्रकारांना न्याय देणार-आर.आर.

0
903

मुंबई दिनांक 15 – पत्रकार संरक्षण कायदा आणि वृध्द पत्रकारांना पेन्शन देण्याबाबतचा प्रस्ताव येत्या कॅबिनेटसमोर मांडून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री श्री.आर.आर.पाटील यांनी शनिवारी दिले.
विधान सभेचे अध्यक्ष श्री. दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत आर.आर.पाटील यांनी पत्रकारांना गुंडांपासून तर संरक्षण मिळालेच पाहिजे आणि पत्रकारांना निर्भय़पणे आपले काम करता आले पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.त्यामुळे पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शनबाबतचा प्रस्ताव येत्या कॅबिनेटच्या बैठकीसमोर ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेऴी सांगितले.
पत्रकारांनी एखादी तक्रार दाखल केल्यानंतर त्या पत्रकाराच्या विरोधात कोणी क्रॉस कंम्लेन दाखल केली असेल तर अशाी तक्रार दाखल करून घेण्यापुर्वी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्याची खातरजमा करून घेतली जाईल आणि मगच ती दाखल करून घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.त्याबाबतचे परिपत्रक लगेच काढण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रारंभी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीबाबतचे एक निवेदन दिलीप वळसे पाटील आणि आर.आर.पाटील यांना सादर केले.त्यामध्ये देशातील नऊ राज्यात पत्रकारांना पेन्शन योजना लागू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.तसेच राज्यात दर चार दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत असल्याने त्याला पायबंद घालण्यासाठी पत्रकार कायदा करावा अशी मागण्ीी करण्यात आली आहे.केर्दीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही केंद्र सरकार पत्रकार संरक्षण कायदा करण्याचा विचार करीत असल्याचे सूचोवाच केले आहे.तत्पुर्वी महाराष्ट्राने हा कायदा करावा अशी आग्रही मागणी देशमुख यांनी केली आहे.
नंतर माध्यमांशी बोलताना एस.एम.देशमुख यांनी श्री.दिलीप वळसे पाटील यांनी आर.आर.पाटील यांच्या समवेत झालेल्या चर्चेबाबत आम्ही समाधानी असून येत्या पंधरा दिवसात पत्रकारांचे दीर्घकाळ प्रलंबित राहिलेले प्रश्न सुटतील अशी आम्हाला आशा असल्याचे स्पष्ट केले.आर.आर.पाटील यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे हा विषय कॅबिनेटसमोर आणला गेले नाही तर राज्यातील पत्रकार निर्णायक आंदोलन करतील असा इशाराही एस.एम.देशमुख यांनी दिला आहे.यावेळी टीव्हीजेयूचे अध्यक्ष विलास आठवले यांनी आपली भूमिका मांडली.
दिलीप वळसे पाटील यांनी बोलाविलेल्या बैठकीस मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार,उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज, डी.के.वळसे पाटील,मंत्राल्य आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रवीण पुरो,मंदार पारकर,सुरेंद्र गांगन,मुंबई महापालिका वार्ताहर ंसघाचे अध्यक्ष सुचित म्हामूणकर ,बहुजन पत्रकार संघाचे अघ्यक्ष आवारे पाटील,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पाबळे,पुणे शहराध्यक्ष राजेंद्र कापसे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब गोरे,उपाध्यक्ष सुनील वाळूंज,दत्तात्रय सुर्वे सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पा टणे,सातारा जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक सुचित अंबेकर तसेच अन्य संघटनांचे प्रतिनिधी,वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here