पत्रकार निर्धाऱ मोर्चाच्या संदर्भात …

3
1001

निर्धाऱ मोर्चाच्या संदर्भात …
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या आवाहनानुसार आपण सारे 2 ऑक्टोबर16 रोजी रस्त्यावर उतरत आहोत.आपला हा मोर्चा गांधी जयंतीच्या दिवशी असल्याने तो नेहमी प्रमाणे शांततेच्या मार्गानेच असेल.काही सदस्यांनी प्रश्‍न असा उपस्थित केला आहे की,गांधी जयंतीच्या दिवशी सुटी असल्याने निवेदन कुणाला द्यायचे ? .या आंदोलनात निवेदन फारशे महत्वाचे नाही.ते फॅक्स किंवा मेल ने जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्र्यांना पाठवावे.मात्र आपली एकजूट आणि आपला आक्रोश मुकपणे व्यक्त कऱणे तसेच काहीही झाले म्हणजे हल्ले झाले,खोटे गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरणार नाही असा आपला निर्धार हल्लेखोर,बदमाश तसेच सामांन्य जनतेपर्यंत पोहोचविणे हा निर्धार मोर्चाचा उद्देश आहे.मुंबईत आम्ही राज्यपाल,मुखयमंत्र्यांना भेटणार आहोत.आपल्या गावात मंत्री,पालकमंत्री असतील तर आपणही त्यांची भेट घेऊन आपला संताप आणि पत्रकार संरक्षण कायदा कऱण्यास सरकार करीत असलेल्या दिरंगाईबद्दलचा राग त्याच्याजवळ व्यक्त करावा.ढेपे प्रकऱण असो किंवा अन्य प्रकऱणात असे दिसून आले आहे की,जेव्हा पत्रकारांवर हल्ले होतात,खोटे गुन्हे दाखल होतात तेव्हा समाज आपल्यापासून अंतर ठेऊन वागतो.वेळ येते तेव्हा ज्या समाजाला सर्वात अगोदर पत्रकाराची आठवण येते मात्र पत्रकाराला समाजाची गरज असते तेव्हा तो चार होत दूर असतो.हे वास्तव आहे.या मोर्चाच्या माध्यमातून समाज आणि पत्रकारांमधील गैरसमजाची ही दरी दूर व्हावी असाही प्रयत्न होणार आहे.आजपर्यंत राजकारणी आपल्यातील दुहीचा नेहमीच गैरफायदा घेत आले आहेत.दोन पत्रकार एकत्र येतच नाही असं अनेक राजकाऱणी छातीढोकपणे सांगत असतात.आपली अशक्य वाटणारी एकी पाहून राजकारण्यांवर छाती बडवून घेण्याची वेळ आली पाहिजे असाही या मोर्चाचा उद्देश आहे.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा मोर्चा यशस्वी झाला पाहिजे असे नम्र आवाहन आहे.मोर्चानंतर जे निवेदन आपण फॅक्सने पाठविणार आहोत ते समान असले पाहिजे यासाठी समितीच्यावतीने निवेदन तयार करून दिले जाईल.त्याखाली आपल्या जिल्हयातील विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांची नावे आणि स्वाक्षर्‍या असाव्यात.मोर्चे शक्यतो  जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या बॅनरखालीच निघावेत आणि प्रत्येकाने आपल्या संघटनेच्या चपला काही काळ बाजुला ठेवाव्यात.असेही आवाहन करीत आहोत.मूक मोर्चे काढताना पत्रकारांनी हातात काळे झेंडे घ्यावेत,तसेच काळ्या फिती लावून हल्ले आणि खोट्या गुन्हयांचा निषेध करावा.तसेच परत एकदा मुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठवून आता अती झाल्याचा इशारा ध्यावा.( एसएमएसचा मजकूर आणि तो कोठे पाठवायाचा याचा तपशील पाठविला जाईल ) मोर्चा गांधी पुतळ्याजवळ गेल्यानंतर किवा ठरलेल्या ठिकाणी पोहोचलण्यानंतर प्रमुख पत्रकारांनी उपस्थितांना संबोधित करावे.या शिवाय प्रत्येक जिल्हा शाखा आपल्या पध्दतीनं आंदोलन करू शकेल मात्र आंदोलन शांततेतच झाले पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. मोर्चेकर्‍यांच्या हाती जे फलक असतील ते देखील समान असावेत यासाठी हिंदी आणि इंग्रजीतल्या घोषणाही 27 पर्यंत करून पाठविल्या जातील.मोर्चाच्या संदर्भात पत्रकारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करावा.आपआपल्या ग्रुपवरून मोर्चा संदर्भातल्या बातम्या,माहिती फॉरवर्ड करावी.ट्टिटर,फेसबुक,व्हॉटस अ‍ॅपचा त्यासाठी उपयोग करता येऊ शकेल.आपल्या भागातील स्थानिक दैनिकात बातम्या छापून आणण्यासाठीही प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा आहे.

2 ऑक्टोबरला राज्यातील 36 जिल्हयातले 25 हजार पत्रकार रस्त्यावर उतरत आहेत असा दावा आम्ही सरकारकडे केला आहे.तो खोटा ठरणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची आहे.2 ऑक्टोबरचा हा भीमटोला बसला तर सरकारला कायदा करावाच लागणार आहे.त्यादृष्टीने कारवाई सुरू झाल्याचेही महासंचालकांनी कालच आम्हाला सांगितले आहे.तेव्हा मित्रांनो प्लीज..

पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती मुंबई

3 COMMENTS

  1. वरील निवेदन कोपी होत नाही त्यामुळे सदर निवेदन पीडीएफ मध्ये आपण तयार करून फेसबुकला टाकले तर ते डाऊनलोड करून पत्रकाराच्या वेगवेगळ्या ग्रुप वर टाकता येईल whats app वर टाकता येईल त्यामुळे याचा विचार करावा हि नम्र विनंती आशिष बोरा कर्जत जिल्हा अहमदनगर मो ९४२३७८८३७०/८८५५९६६६८९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here