पत्रकार तुषार खरात यांना बेदम मारहाण
काल आणखी एका पत्रकारावर हल्ला झाला.घटना सातारा जिल्हयातील आहे.माणः खटावचे आमदरा जयकुमार गोरे यांचे बंधू आणि माण पंचायत समितीचे सदस्य शेखर गोरे यांनी काल पांढरवाडी येथील मतदान केंद्रात घुसून सकाळचे प्रतिनिधी तुषार खरात यांना बेदम मारहाण केली.उपलब्ध माहितीनुसार पांढरवाडी येथील एका ग्रामपंचायत सदस्यानं राजीनामा द्यावा यासाठी काही दिवसांपासून शेखर गोरे संबंधित महिला सदस्या आणि त्यांच्या पतीवर दबाव आणत होते.पण ते राजीनामा द्यायला तयार नव्हते.त्यामुळे 17 एप्रिल रोजी गोरे आपल्या पन्नास कार्यकर्त्यांसह बेकायदेशीररित्या मतदान केंद्रात घुसले आणि त्यांनी बाबूलाल मुलाणी यांना मारायला सुरूवात केली.यावेळी तेथे उपस्थित असलेले पत्रकार तुषार खरात यांनी मध्यस्थी कऱण्याचा प्रयत्न त्यांनाही मारहाण केली गेली.त्यात ते जखमी झाले आहेत.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या घटनेचा निषेध केला असून पत्रकारास मारहाण तसेच बेकायदेशीरपणे मतदान केंद्रात घुसल्याच्या आरोपाखाली गोरे यांंंंच्यावर कारवाई करावी अशी मागणीही समितीनं केलीय.
राज्यातील पत्रकाारांवर या वर्षात झालेला हा 18 वा हल्ला आहे.