मुंबई- भूतपूर्व पत्रकार आणि टाटा स्टीलचे जनसंपर्क अधिकारी चारूदत्त देशपांडे यानी 28 जून 2013 रोजी केलेल्या आत्महत्येची सीबीआयमार्फत चौकशी कऱण्याचे आदेश देण्यात आले आहेत.अशी माहिती मुंबईत काल एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली.
टाटा स्टीलमधील काही अधिकाऱ्यांनी देशपांडे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले अशी देशपांडे यांच्या नातेवाईकांची तक्रार होती.त्यामुळे त्याची चौकशी करावी अशी मागणी केली जात होती.मात्र पोलिस या घटनेकडे फारशे गंाभीर्यानं बघायला तयार नव्हते.त्यामुळे विविध पत्रकार संघटना आणि देशपांडे कुटुबियांच्यावतीनं सतत पाठपुरावा केला जात होता.अखेर आता या प्रकरणाची सीबीआयतर्फे चौकसी होणार आहे.सरकारच्या या निर्णयाचेे पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्वागत करीत आहे.