वरिष्ठ संपादक,लेखक,खुशवंत सिंह यांचे आज दिल्लीत निधन झाले.मृत्यूसमयी ते 99 वर्षांचे होते. गेली अॆनक दिवस आजारी असलेल्या खुशवंत सिंह यांनी आज आपला निरोप घेतला.
2 फेब्रुवारी 1915 रोजी पंजाबातील एका गावात जन्मलेल्या खुशवतं सिह यांची पत्रकारितेतील कारकीर्द वादळी ठरली.इलेस्टेटेड विकलीचे संपादक असताना त्यानी विकली नवा आयाम मिळवून दिला.हिंदुस्थान टाइम्स ,नॅशनल हेरॉल्ड आणि अन्य काही दैनिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले. योजना या सरकारी नियतकालिकाचे संपादनही त्यांनी केले होते.
बिनधास्त स्वभाव,तेवढीच रोखठोक लेखनशैली आणि मिस्किल स्वभावाच्या खुशवंत सिंह यांना पद्मविभूषण मिळालेले आहे.ते राज्यसभा सदस्यही राहिलेले आहेत.गेल्या वर्षीच म्हणजे वयाच्या 98व्या वर्षी त्यांचे एक पुस्तक प्रसिध्द झाले होते.
त्यांच्या निधनाने इंग्रजी पत्रकारितेतील एक वादळी पर्व संपले आहे.बातमीदारची खुशवंतसिंह यांना भावपूर्ण श्रध्दांजली