नवी दिल्लीःज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर याचं आज निधन झालं.के 94 वर्षांचे होते.दिल्लीतील द स्टेट्समन या पत्रात संपादक म्हणून त्यांनी काम केले होते.इंडियन एक्स्प्रेस ,डेक्कन हेराल्ड,द डेली स्टार,द संडे गार्डियन,ट्रिब्यून पाकिस्तान,डॉन पाकिस्तान यासह 80 विविध भाषक वृत्तपत्रांसाठी त्यांनी स्तंभ लेखन केलं होतं.त्यांची पंधरा पुस्तकं प्रसिध्द आहेत.
कुलदीप नय्यर यांचा जन्म 14 ऑगस्ट 1923 मध्ये पाकिस्तानातील सियालकोटमध्ये झाला.इंडियन एक्स्प्रेसचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले.आणीबाणीत त्यांना तुरूंगवास भोगावा लागला.त्यांनी राज्यसभा सदस्य म्हणूनही काम केले होते.त्यांच्या निधनाने पत्रकारिता आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
सुधीर पाटणकर यांचं आज निधन
दूरदर्शनचे ज्येष्ठ माजी निर्माते सुधीर पाटणकर यांचं आज सकाळी मुंबईत अल्प आजारानंतर निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. कोर्टाची पायरी, आजचे पाहुणे, युवदर्शन, आमची पंचवीशी, साप्ताहिकी, बातम्या, या कार्यक्रमांच्या शेकडो भागांची तसंच प्रतिभा आणि प्रतिमा च्या काही भागांचीहि त्यांनी निर्मिती केली होती. मराठी रंगभूमीविषयी त्यांचा उत्तम अभ्यास होता. तंत्रावर प्रभुत्व असलेले, शांत स्वभावाचे पण शिस्तप्रिय निर्माते म्हणून सहकारयांमधे व कलाकारांना ते प्रिय होते. मूळचे नागपूरचे असलेले पाटणकर पस्तीस वर्षांच्या दुरदर्शन सेवेनंतर निवृत्त होताना सहाय्यक संचालक झाले होते.