गुजरातमधील जुनागड पोलिसांनी पत्रकार किशोर दवे यांच्या हत्येप्रकरणी आज तीन आरोपींना अटक केली आहे.दोन आरोपींना चौबरी गावातून अटक करण्यात आली तर,एकाला मोरबी गावातून अटक करण्यात आली आहे.किशोर दवे हे’जय हिंद’वृत्तपत्राचे विभागीय प्रमुख होते. हल्लेखोरांनी वृत्तपत्राच्या कार्यालयात घुसून किशोर यांच्यावर चाकूने वार केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
किशोर यांच्या हत्येत माजी मंत्री रतिलाल सुरेजा यांचा मुलगा डॉ. भावेश सुरेजा यांचा हात असल्याचा आरोप किशोरच्या कुटुंबीयांनी केला आहे.