पत्रकारांचं कल्याण (?) करणार्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीची पुनर्रचना केली गेलीय.जवळपास सहा महिने समितीवर कोणाला घ्यायचे याचा ‘शोध’ सुरू होता.तशी पत्रं विभागीय माहिती उपसंचालकांना पाठविली गेली होती.तो शोध आता संपला असून पुन्हा एकदा पत्रकारांच्या कल्याणाचा(?) मार्ग मोकळा झालाय. सात विश्वस्त या मंडळावर असतील.यातील दोन मुंबईतले आहेत,दोन नागपूरचे,एक नाशिकचा आणि एक लातूर तर एक यवतमाळचा आहे.ग्रामीण भागाची नेहमीप्रमाणंच उपेक्षा झालेली आहे.
समितीवर जे अशासकीय सदस्य घ्यायचे असतात त्यातही असाच पक्तीभेद.नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ या दोन्ही संस्था महाराष्ठ्र श्रमिक पत्रकार संघाशी संलग्न आहेत. असं असतानाही श्रमिक पत्रकार संघाचे तीन सदस्य या समितीवर घेऊन यापुढं केवळ श्रमिकांचंच राज्य या समितीवर असेल अशी व्यवस्था केली गेली.मराठी पत्रकार परिषदेचा एक सदस्य समितीवर जाणार आहे.पत्रकारांसाठी काम करतेय परिषद आणि मलिदा खाताहेत भलतेच हे पुन्हा एकदा दिसून आलंय.
संदीप प्रधान ( लोकमत मुंबई)
संदीप आचार्य ( लोकसत्ता मुंबई)
राहूल पांडे ( हितवाद ,नागपूर )
गजानन जानभोर ( लोकमत नागपूर )
जयप्रकाश पवार ( दीव्य मराठी नाशिक )
अशोक चिंचोले ( भूकंप लातूर )
अनिरूध्द पांडे ( तरूण भारत यवतमाळ )
सर्वाचं अभिनंदन.या सदस्यांकडून सर्व पत्रकारांना समान न्याय मिळेल अशी अपेक्षा.