महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून पत्रकार उपचारासाठी मुंबईत येत असतात. तिथं आल्यावर त्यांना विविध अडचणींना तोंड द्यावं लागलं.मुळात राहण्याच्या व्यवस्थेपासूनच वनवास सुरू होतो.आर्थिक अडचण हा देखील महत्वाचा विषय असतो.त्यामुळे मुंबईला उपचारासाठी जायचंय या कल्पनेनंच अनेक पत्रकारांचा थरकाप उडतो .
.अशा स्थितीत त्यांना मुबईत थोडी फार मदत झाली तर ती देखील महत्वाची असते.हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊनच मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधून आजपासून “पत्रकार आरोग्य सेवा कक्ष”आम्ही मुंबईतील परिषदेच्या कार्यालयात कार्यान्वित करीत आहोत.त्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणार्या तरूण पत्रकारांची एक समिती मंगश चिवटे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली असून या समितीत किऱण नाईक, विनोद जगदाळे,रायगडचे मिलिंद अष्टीवकर,सुनील ढेपे याचा समावेश असणार आहे.ज्यांना मुंबईत उपचाराची अडचण आहे अशा पत्रकारानी समितीतील कोणत्याही सदस्याशी संपर्क साधता येईल.
मराठी पत्रकार परिषदेचा पत्ता-
मराठी पत्रकार परिषद,
प्रशासकीय अधिकारी वसतीगृह,
9 हजारीमल सोमाणी मार्ग,सीएसटी,
मुंबई-1,फोन 022-22076459
मंगेश चिवटे- 9665951515
किरण नाईक – 9820784547
विनोद जगदाळे- 9819771903
मिलिंद अष्टीवकर -9923637500
सुनील ढेपे 9420477111
आरोग्य सेवा कक्षाचे अधिकृत उद्दघाटन 6 जानेवारीला परिषदेच्या ठाण्यात होत असलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात होत असले तरी गरजू पत्रकारांना लगेच वरील फोन नंबर्सवर संपर्क साधता येईल.
मराठी पत्रकार परिषदेचे कार्यालय सध्या 11 ते 3 या वेळेत उघडे असले तरी येत्या काही दिवसात आठ तास हे कार्यालय उघडे राहिल अशी व्यवस्था करण्यात येत आहे.