मुंबईः आपल्या विविध मागम्यांसाठी राज्यातील पत्रकार सोमवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून सरकार पत्रकारांच्या मागण्यांकडं करीत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध करतील.या आंदोलनाची राज्यभर जोरदार तयारी सुरू आहे.रायगड,सातारा,बीड,नांदेड आदि जिल्हयात आंदोलनाची कशी तयारी सुरू आहे याचा सविस्तर वृत्तांत खालील लिंकवर वाचता येईल.
नांदेडमध्ये आंंदोलनासाठी पत्रकार सज्ज
मराठी पत्रकार परिषद, मुंबईच्यावतीने मा. एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 26 नोव्हेंबर रोजी पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार पत्रकारांना पेन्शन लागू करावी, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी त्वरित करावी यासह इतर मागण्यांसाठी 26 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि नांदेड महानगर मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या धरणे आंदोलनात नांदेड महानगरातील तसेच जिल्ह्यातील पत्रकारांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य रामभाऊ शेवडीकर, प्रकाश कांबळे, विभागीय सरचिटणीस विजय जोशी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापूरकर, महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वनाथ देशमुख, कार्याध्यक्ष रवींद्र संगनवार, सरचिटणीस अभय कुळकजाईकर, उपाध्यक्ष अविनाश पाटील, किरण कुलकर्णी तसेच नरेश तुप्तेवार, सूर्यकुमार यन्नावार, अमृत देशमुख, संभाजी सोनकांबळे, ज्ञानेश्वर सुनेगावकर यांनी केले आहे.
सातार्यात पत्रकारांचा एल्गार
सातारा : प्रतिनिधी
पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी, पत्रकार पेन्शन, छोटया वृत्तपत्रांचे अस्तित्व संपवून टाकणारे जाहिरात धोरण मागे घेणे, अधिस्वीकृतीबाबतच्या जाचक अटी शिथिल करणे आणि ‘मजिठिया’च्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी सातारा जिल्हा पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्यावतीने सोमवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व सर्व तहसील कार्यालयांसमोर सकाळी 11 वाजता अंदोलन करण्यात येणार आहेे.
पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला पण त्याची अंमलबजावणी होत नाही. पेन्शनची घोषणा झाली पण अजून त्याचीही अंमलबजावणी नाही. छोटया वृत्तपत्रांसाठीच्या जाहिरात धोरणात बदल करून ती छोटी वृत्तपत्रे बंदच होतील अशा पध्दतीन धोरण आखले जात असून त्याचा मोठा फटका वृत्तपत्र व्यवसायाला बसणार आहे. मजिठियाच्या अंमलबजावणीबाबतही शासनाची उत्साही भूमिका नाही.सरकार घोषणा करते पण अंमलबजावणी करत नसल्याने राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष आहे. तो व्यक्त करण्यासाठी सोमवारी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी राज्यातील पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करतील. आपल्या भागातील आमदारांना भेटून पत्रकारांचे प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्याबाबत विनंती करावी. 26 तारखेला छोटया आणि जिल्हा वृत्तपत्रांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर अग्रलेख लिहून शासनाचे लक्ष पत्रकारांच्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले आहे.
16 नोव्हेंबर रोजी राज्यातील पत्रकारांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या सरकारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. आता थेट रस्त्यावर उतरून पत्रकार आपला आक्रोश जनता आणि सरकारच्या कानावर घालावा. देशात आणि राज्यात विविध मार्गानं पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. पत्रकारांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांकडे केल जाणार दुर्लक्ष हा त्याचाच भाग आहे. सरकारच्या या धोरणाच्या विरोधात राज्यातील सर्व पत्रकार संघटनांनी आपसातील वाद बाजूला ठेऊन या आंदोलनात सहभागी व्हावे, असेही देशमुख यांनी सांगितले आहे.
सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीनेही जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे. दहा तालुक्यांच्या तहसीलदार कार्यालयांसमोर त्या त्या तालुक्यातील तालुका पत्रकार संघाचे पत्रकार 11 वाजता आंदोलन करतील व तहसीलदारांना निवेदन देतील. सातारा शहर व सातारा तालुक्यातील पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 11 वाजता आंदोलन करतील व जिल्हाधिकार्यांना निवेदन देतील. संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी 26 नोव्हेंबर रोजी आंदोलनात उतरावे, से आवाहन सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, प्रवीण जाधव इलेक्ट्रॉनिक मिडीया असोसिएशनचे अध्यक्ष सचिन जाधव यांच्यासह पदाधिकार्यांनी केले आहे.
बीडमध्ये आंदोलनाचा दणका उडणार
*मराठी पत्रकार परिषद,* *मुंबईच्यावतीने पत्रकारांचे नेते मा. एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २६ नोव्हेंबर रोजी पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार पत्रकारांना पेन्शन लागू करावी, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी त्वरित करावी, अधिस्वीकतीच्या जाचक अटी शिथिल करा, क वर्गीय जिल्हा दैनिकाच्या जाचक अटी शिथिल करा*
*यासह इतर मागण्यांसाठी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषद आणि* *बीड जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या धरणे आंदोलनात* *बीड शहरातील तसेच जिल्ह्यातील पत्रकारांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.*
रायगडमध्येही आंदोलनाचा जोर असणार
26 नोव्हेंबर च्या धरणे अंदोलनात मोठ्या संख्येने पञकार बांधवानी सहभागी व्हावे*
रायगड जिल्हाधीकारी कार्यालया समोर 26 नोव्हेंबर रोजी सोमवारी सकाळी 11-00 पासून धरणे अंदोलन* करण्यात येणार आहे *पञकाराचे विवीध प्रंलबीत प्रश्न व राज्य शासनाची नाकर्ते पणाची भुमिका* या विरूध्द हेस अंदोलन करण्यात येणार असून आपले प्रश्न आपले अंदोलन समजून आपण या अंदोलनात सहभागी व्हावे व पञकारा चे *एकजूटीची* ताकद दाखवावी आपण आवश्य उपस्थीत रहावे हि विंनती
*आपले*
विजय मोकल , अध्यक्ष रायगड प्रेस क्लब