साथी हात बढाना…
रत्नागिरीत आजारी पत्रकारास आर्थिक मदत

रत्नागिरी : पत्रकार अडचणीत असतो तेव्हा ना समाज त्याच्या बरोबर असतो, ना सरकार ना तो ज्या वृत्तपत्रासाठी काम करतो ते व्यवस्थापन… अशा स्थितीत पत्रकारांनीच पत्रकारांसाठी मदतीचा हात दिला पाहिजे… या आमच्या आवाहनास राज्यभर चांगला प्रतिसाद मिळत असून बहुतेक जिलहयांनी आपले कल्याण निधी उभे करून गरजू पत्रकारांना मदत करायला सुरूवात केली आहे.. रत्नागिरीतही हा प़योग यशस्वीपणे राबविला जात आहे.. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य संदेश सावंत मेंदू विकाराने आजारी आहेत.. त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले आहे.. अथाॅतच पत्रकार असल्याने त्यांची आर्थिक अडचण होती.. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या कल्याण निधीतून त्यांना 30 हजार रूपयांची मदत केली गेली आहे.. 30 हजारांची रक्कम मोठी नाही पण त्यामागची भावना महत्वाची आहे.. कल्याण निधीसाठी मोठा निधी जमविण्याचा रत्नागिरीच्या पत्रकारांचा संकल्प आहे.. त्यासाठी एक स्मरणिका काढली जात आहे.. समरणिकेसाठी सवॅ तालुकयांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष हेमंत वणजू यांनी केले आहे..
संदेश सावंत यांच्या प्रकृतीस लवकर आराम पडावा हीच शुभकामना..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here