होळीचे फोटो काढल्यामुळे पत्रकारास बेल्टने मारहाण
फोटो काढल्यामुळे जमावाने बेदम मारहाण केल्याची राहुरीतील घटना ताजी असतानाच होळीच्या दिवशी परभणी जिल्ह्यातील असोला येथे असाच प्रकार घडला. देशोन्नतीचे पत्रकार गोपीराज जावळे होळीचे फोटो काढत असताना फोटो काढायचे नाहीत असा दम देत राजू जावळे यांनी अगोदर शिविगाळ आणि मग पत्रकारास बेल्टने मारहाण केली. गोपीराज जावळे यांनी विरोध केला असता राजू जावळे यांनी जवळचा चाकू काढला असे या संबंधी ताडकळस पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी अजून आरोपींना अटक केली गेली नाही.. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या घटनेचा निषेध केला आहे..