नागपूर : खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेतीमाफिया आणि अवैध धंदे व्यावसायिकांना अभय देणार्या ठाणेदार भीमराव टेळे यांच्याबाबत वृत्त प्रकाशित होताच त्यांनी पत्रकाराविरुद्धच गुन्हा दाखल केला. एवढेच नव्हे तर, सदर पत्रकाराला धमकीदेखील दिली. या प्रकाराची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी गंभीर दखल घेतली. आरती सिंह यांनी या ठाणोदाराला तडकाफडकी सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश दिले असून, दुसरीकडे पालकमंत्री बावनकुळे यांनी या पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना पत्र पाठवून या संदर्भात कारवाई करण्यातचे निर्देश दिले. या प्रकाराबाबत लोकमतमध्ये रविवारी ‘खापरखेड्याच्या ठाणोदाराची दबंगगिरी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी त्या वृत्ताची लगेच गांभीर्याने दखल घेत ठाणेदार भीमराव टेळे यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठविले. खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान नदीच्या रेतीघाटांमधून मोठय़ा प्रमाणात रेतीची चोरी केली जात आहे. शिवाय, विविध अवैध धंद्यांमध्येही वाढ झाल्याने गुहेगारीला पोषक वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. विशेष म्हणजे, या ठाण्याच्या हद्दीतील सिल्लेवाडा, चनकापूर हा भाग आधीच अतिसंवेदनशील भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत लोकमतमध्ये वारंवार वृत्त प्रकाशित झाल्याने टेळे चांगलेच चिडले होते. त्यांनी सदर पत्रकाराला शिवीगाळ केली. हा प्रकार एवढय़ावरच थांबला नाही तर, त्यांनी शुक्रवारी पत्रकाराविरुद्ध खापरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आणि प्रकरण चौकशीत ठेवले. हा प्रकार डॉ. आरती सिंह यांच्या निदर्शनास येताच त्यांनी टेळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून नागपूर (ग्रामीण) पोलीस नियंत्रण कक्षात तत्काळ बदली करण्याचे आदेश जारी केले. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी हगवणे यांनी टेळेंकडून ठाण्याचा प्रभार स्वीकारला.(प्रतिनिधी) ठाणेदाराची भूमिका संतापजनक
पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करणे हा प्रकार खूपच गंभीर आहे. वस्तुस्थिती मांडण्याचे काम पत्रकार करतात. खापरखेडा ठाणेदाराने घेतलेली भूमिका संतापजनक आहे. याबाबत पोलीस महासंचालकांना चौकशीचे निर्देश दिले आहे. यापुढे असा प्रकार कदापि खपवून घेणार नाही.
– चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री, नागपूर
दुर्दैवी प्रकार
झालेला प्रकार दुर्दैवी आहे. पत्रकारच नव्हे तर कुणावरही अशाप्रकारे आकसाने गुन्हे दाखल होऊ नये. अशा घटनांमुळे पोलीस खात्याची नाहक बदनामी होते. यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. विशेषत्वाने लक्ष दिले जाईल.
– डॉ. आरती सिंह, पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण
.
News Feed
S.m. Deshmukh
· Pune ·
अबतक 14
माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या “अवघ्या” चौदा फायलीच मुख्यमंत्र्यांकडे गेल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.यातील दोन फाईल पेंडिगं आहेत.असंही बातमीत म्हटलं गेलं आहे.अन्य विभागाच्या ज्या फायली मुख्यमंत्र्यांकडं गेल्या आहेत त्याची संख्या बघा.सामांन्य प्रशासन विभागाच्या 156