माजलगाव न्यायालयाचा निकाल
माजलगाव, दि.17(प्रतिनिधी)ः तालुक्यातील तालखेड येथील पत्रकार अरविंद आश्रुबा ओव्हाळ यांना ग्रामपंचायत व सोसायटीच्या बातम्या विरोधात का छापतो म्हणून, त्यांच्यावर हल्ला करणार्या 18 जणांना सहा महिणे शिक्षा व प्रत्येकी पाचशे रूपये दंडाची शिक्षा माजलगाव न्यायालयाचे न्यायधिश जे.आर.राऊत यांनी बुधवारी सुनावली.
माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील पत्रकार अरविंद ओव्हाळ यांनी तालखेड ग्रामपंचायत व सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत सत्ताधारी सुंदर जाधव यांच्या पॅनल विरोधात बातम्या छापल्यामुळे त्यांना निवडणूकीत पराभव स्विकारावा लागला. याचा राग मनात धरून सुंदर किसन जाधव, रामभाऊ किसन जाधव, राजाभाऊ किसन जाधव, रामा लक्ष्मण जाधव, विठ्ठल नवनाथ जाधव, नितीन भास्कर जाधव, सुरेश काशिनाथ कांबळे, अजय गौतम जाधव, अशोक विठ्ठल लवनाडे, राजु वसंत जाधव, नवनाथ किसन जाधव, सुमेध बळीराम जाधव, बळीराम किसन जाधव, बबन रामभाऊ जाधव, विजय मच्छिंद्र जाधव, अनिल सुंदर जाधव, वसंत मच्छिंद्र जाधव, प्रकाश छलबा जाधव यांनी संगणमत करून दि.26 जुन 2013 रोजी रात्रीच्या वेळेस पत्रकार अरविंद ओव्हाळ हे तालखेड फाट्यावरील हॉटेलमध्ये बसलेले असतांना त्यांना स्टंप, काठ्या, लाथा-बुक्या मारहाण केली. यात अरविंद ओव्हळ हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर बीड जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचार करण्यात आले होते.
पत्रकार अरविंद ओव्हाळ यांनी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपी विरूध्द कलम 326, 143, 147, 148, 149, 504, 506 भादवि नूसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास करून तपास अधिकारी दिपक भिंताडे यांनी माजलगाव न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणी सुनावणी दरम्याण तपास अधिकारी, फिर्यादी, डॉक्टर व फिर्यादीची पत्नी यांच्या साक्ष ग्राह्य धरण्यात येवून वरिल आरोपी विरूध्द कलम 143 मध्ये तीन महिने शिक्षा व 300 रूपये दंड तर 147 मध्ये 6 महिने शिक्षा तर 500 रूपये दंड अशी शिक्षा न्यायधिश जे.आर.राऊत यांनी दि.18 बुधवारी सुनावली. सरकारी पक्षातर्फे विशेष सहकारी अभियोक्ता अॅड.एन.एस.काझी यांनी काम पाहिले