पत्रकारावर हल्ला
कऱणारा रात्री 2 वाजता अटकेत
सातारा जिल्हयाच्या जावळी तालुक्यातील बामणोली येथील पुढारीचे प्रतिनिधी निलेश शिंदे यांना काल रात्री बामणोली आश्रम शाळेतील अधिक्षक यांनी मारहाण केली.या घटनेची माहिती सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांना मिळताच त्यांनी रात्री एस.पी.अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधला.एवढेच नव्हे तर त्यांनी रात्रा मेढ्याला जाऊन तेथील पीआयची भेट घेतली.’तुम्ही आरोपीला उचलून आणता की आम्ही त्याला फरफटत आणू असा पवित्रा त्यांनी घेतला’.त्यानंतर रात्री दोन वाजता पोलिसांनी अधीक्षकाला अटक केली.हरिष पाटणे यांचे वडिल आजारी असतानाही ज्या तडफेने ,व्यक्तिगत अडचणी सांगत न बसता हरिष पाटणे ग्रामीण पत्रकारांच्या मदतीला धावून गेले. मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला हरिष यांचा अभिमान आहे.अशीच तडफ सगळी़क डे दाखविली गेली तर कोणी पत्रकारांवर हल्ले करायला धजावणार नाही