मध्यप्रदेशात देखील महाराष्ट्रप्रमाणेच पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झालेली आहे.आज सकाळी साडेनऊ वाजत बैतूल येथील कारगिल चौकात पत्रकार लक्ष्मीनारायम साहू यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी लाठ्या-काठ्यांनी प्राणघातक हल्ला केला.त्यात साहू गंभीर जखमी झाले.त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या हल्ल्याचा मध्यप्रदेश श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राधावल्लभ शारदा आणि बैतूल जिल्हयाचे अध्यक्ष प्रवी़ण गुगनानी यांनी निषेध केला असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.