📌
पत्रकाराच्या मुलीच्या उपचारासाठी १,४१,४५९/- रुपयांची आर्थिक मदत..!*
*नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा, तालुका पदाधिकारी व सभासदांचे मनापासून आभार..!
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सभासद व तालुक्यातील शिंदे येथील दैनिक गावकरीचे पत्रकार अरुण तुपे यांची कन्या कु.साक्षी हि नाशिकरोड येथील महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.
महाविद्यालयाच्या हिवाळी शिबिरासाठी गेली असता तिला झोपेतच डोक्यात रक्तस्राव झाला.उपचारासाठी हॉस्पिटलमधे दाखल केले असता मेंदूत ४० टक्के रक्त असल्याचे निदान झाले व तिच्यावर तातडीने शस्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यासाठी डॉक्टरांनी सहा लाख रुपये खर्च सांगितला.
अरुण तुपे हे पत्रकारीतेबरोबर शिंदे या छोट्याशा खेडेगावात केशकर्तनालय हा व्यवसाय करतात.आर्थिक परिस्थिती बेताचीत..म्हणजे हातावरचीच असतांना त्यावर मात करत कर्ज, उधार-उसणवारी करुन सुमारे साडेचार लाख रुपये खर्च पेलला.शस्रक्रिया यशस्वी पार पडली.मेंदुजवळील डोक्याच्या कवटीचा भाग कु. साक्षीच्या मांडीत ठेवण्यात आला व महिन्यानंतर पुन्हा शस्रक्रिया करुन तो बसविला जाणार आहे.त्यासाठी सव्वा ते दिड लाख रुपये खर्च येणार असल्याने तुपे कुटुंबिय पुन्हा आर्थिक संकटात सापडले.
गेल्या आठवड्यात नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या ओळखपत्र व हेल्थ कार्ड वितरणासाठी बैठक आयोजित करण्यात आली असता तेथे सरचिटणीस कल्याणराव आवटे यांचेकडून ही माहिती मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत पवार यांना समजली.. .त्यानंतर नाशिक जिल्हा संघाने मदतीसाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभासदांना संदेश पाठवत याबाबत विनंती वजा आवाहन केले.अनेकांनी केलेल्या आवाहनास उत्तम प्रतिसाद देत १,४१,४५९/- रुपये एवढी मदत जमा केली व अरुण तुपे यांच्या घरी जाऊन मदतीची रक्कम त्यांचेकडे सुपूर्द केली.कन्या साक्षीची भेट घेऊन तब्बेतीती चौकशीकरुन तिला जिल्हा भरातील सभासदांच्यावतीने शुभेच्छा दिल्या.
. यशवंत पवार *जिल्हा सरचिटणीस कल्याणराव आवटे आणि प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी व सभासदांचे खुप खुप सहकार्य लाभले.त्यांचे मराठी पत्रकार परिषदेचयवतीने आभार मानण्यात आले आहेत.. सरकारी मदतीच्या आशेवर न बसता जिल्हयातील पत्रकारांनी पत्रकारास मोठा हातभार लावला हे कार्य अनुकरणीय तसेच अभिनंदनीय असल्याचे मत एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहेत.एस.एम.देशमुख यांनी यशवंत पवार यांचे उल्लेखनिय कार्याबददल आभार मानले आहेत..