अंबाजोगाईच्या पत्रकाराने दिले एकाआदिवासी महिलेला जीवदान*
माजलगावच्या पत्रकार मित्रांनी एका स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवा वृध्द महिलेला केलेल्या मदतीची चर्चा राज्यभर सुरू असतानाच अंबाजोगाई येथील मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष गजानन मुडेगावकर यांनी महिला दिनाच्या दिवशी एका आदिवासी महिलेला जीवदान दिल्याची बातमी समोर आली आहे. ..देवडी येथे मजुरीसाठी आलेल्या एका आदिवासी महिलेचे पोट दुखू लागल्यामुळे तिची बीडला नेऊन सोनोग्राफी करण्यात आली.. डॉक्टरांनी पोटात अॅपेंडिक्स असल्याचे सांगून लगेच ऑपरेशनची गरज स्पष्ट केली .. खासगी रूग्णालयात ऑपरेशनसाठी 25 हजार रूपये खर्च करणे संबंधित महिलेला शक्य नसल्याने तिला अंबाजोगाई येथील शासकीय रूग्णालयांत पाठविण्यात आले.. परंतू रूग्णालयात कोणी दाद देत नाही असे कळल्यावर मी पत्रकार गजानन मुडेगावकर यांना फोन केला.. मुलगी आजारी असताना देखील मुडेगावकर सरकारी रूग्णालयात गेले.. त्यांनी पवार नावाच्या या गरीब महिलेला रूग्णालयात दाखल केले.. लगेच तिची शस्त्रक्रिया केली गेली.. डॉक्टर म्हणाले, “आज ऑपरेशन झाले नसते तर कदाचित अॅपेंडिक्स फुटले असते” .. मात्र गजानन मुडेगावकर यांनी वेळेत मदत करून संबंधित महिलेला आज महिला दिनाच्या दिवशी जीवदान दिले आहे.. पत्रकार राम कुलकर्णी यांच्या पत्नी सौ. पुजा कुलकर्णी यांनी देखील काही रक्कम आणि डबा पाठवून मदत केली.. गजानन मुडेगावकर आणि पुजा कुलकर्णी यांचे मनापासून आभार..पत्रकारांबददलच्या नकारात्मक बातम्याच समोर येत असतात .. राज्यात अनेक पत्रकार एक व़त म्हणून पत्रकारिता करतात.. पत्रकारितेबरेबरच सामाजिक बांधिलकी जपणारे गजानन सारखे अनेक पत्रकार आहेत.. परंतू दुसरी बाजू समोर येत नाही.. ती आली तरच पत्रकारांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलू शकेल..म्हणून हा प्रपंच…
41Subhash Choure, Sunil Walunj and 39 others12 Comments1 ShareLikeCommentShare
Comments
Most RelevantWrite a comment…