भारतात पत्रकारांवर दररोज हल्ले होतात,पत्रकारांचे खूनही होतात .मात्र एकाही आरोपीला आपल्याकडं शिक्षा होत नाही.स्लोवाकियामध्ये मात्र पत्रकाराची हत्त्या झाल्यानंतर तेथील पंतप्रधान रॉबर्ट फिको यांना राजीनामा द्यावा लागला आहे.इटालियन माफिया आणि फिको यांच्या निकटवर्तीयांच्या असलेल्या संबंधांबाबत जान कुशिएक यांनी यांनी लिखाण केले होते.तसेच फिको यांच्यासंबंधीत भ्रष्टाचारावरही जान यांनी प्रकाश टाकला होता.त्यानंतर पत्रकाराचाी हत्त्या केली गेली.यावरून स्लोवाकियामध्ये रणकंदन माजले.सरकारने राजीनामा द्यावा यासाठी देशभर उग्र निदर्शने झाले.त्यानंतर अध्यक्षांनी फिको यांचा राजीनामा घेतला आणि फिको मंत्रिमंडळातील उपपंतप्रधान पेटेर पेल्लीगरिनी यांची देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.तीन पक्षाच्या आघाडीचे सरकार आता तेथे सत्तेवर आले आहे.एखादया पत्रकाराची हत्त्या झाल्यानंतर थेट पंतप्रधानांनाच राजीनामा द्यावा लागल्याचे हे अपवादात्मक उदाहरण म्हणावे लागेल.–
पत्रकाराच्या हत्येनं सत्तापालट
(Visited 244 time, 1 visit today)