पत्रकारावर कोण,केव्हा आणि का हल्ला करेल याचा नेम नाही.एखादयाच्या विरोधात बातमी प्रसिध्द केली तर पत्रकारावर हल्ले झाल्याच्या अनेक घटना आहेत.मात्र आता आमच्या निवडीची बातमी का दिली नाहीत असे म्हणतही पत्रकारांवर हल्ले व्हायला लागले आहेत.कोणती बातमी द्यायची किंवा नाही द्यायची याचाही अधिकार आता पत्रकारांना उरलेला नाही असं दिसतंय.
बातमी निलंगा तालुक्यातील सांगवी गावची आहे.तेथील ग्रामपचांयतीच्या उपसंरपंचाची काल निवड झाली.त्याची बातमी का देत नाही म्हणत पुण्यनगरीचे वार्ताहर सतीश मधुकर सरतापे यांच्या घरावर तुफान दगडफेक कऱण्यात आली,अर्वाच्च शिविगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली गेली.सतीश सरतापे यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.या घटनेचा तालुक्यात निषेध होत आहे.-