इंडियऩ एक्स्प्रेसनं अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी दिली आहे.बातमी जळगाव जिल्हयातील आहे.जळगाव जिल्हयाच्या रावेर तालुक्यातील सावधा येथील सामनाचे प्रतिनिधी कैलाशसिंह परदेशी यांचा कोविडनं आज बळी घेतला आहे.परंतू त्यांच्या कुटुंबातले कोरोनाचे ते पहिलेच शिकार नाहीत.दोन दिवस अगोदर त्यांचे बंधू किशोरसिंह परदेशी आणि त्यांच्या पत्नी संगीता परदेशी याचंही निधन झालं .घरातील दोन मुलं आणि सून यांचा आकस्मित मृत्यू झाल्यानं त्यांच्या 85 वर्षांच्या मातोश्रींवर पहाडच कोसळला . हा धक्का त्या पचवू शकल्या नाहीत.तिघांच्या मृत्यूच्या धक्क्यानं त्याचंही निधन झालं.चार दिवसात एकाच कुटुंबातले चार मृत्यू झाल्यानं सार्‍या जळगाव जिल्हयाला धक्का बसला आहे.जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या माहितीन्वये तिघांना कोविडची लागण झाल्यानंतर त्यांनी तीन दिवस घरगुती उपाय केले.म्हणजे त्यांनी रूग्णालायात जायला विलंब केला.त्यामुळे आजार वाढत गेला आणि त्यात त्यांचे निधन झाले…सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी परदेशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून 1990 पासून परदेशी सामनाचे पत्रकार होते ,अत्यंत प्रामाणिक आणि कठोर परिऋम करणारे पत्रकार म्हणून ते सर्वपरिचित होतेअशा भावना त्यानी व्यक्त केल्या आहेत..मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम,देशमुख यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून राज्यातील सर्वच पत्रकारांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.परदेशी कुटुबाला सरकारनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही एस.एम.देशमुख यांनी केली आहे.एकाच कुटुंबातील चार व्यक्ती चार दिवसात मृत्युमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here