ठाणे – कासारवडवली येथील हत्याकांडाचे वृत्तसंकलन करण्यासाठी सिव्हिल रुग्णालयात गेलेल्या हिंदी वृत्तवाहिनीच्या पत्रकार-कॅमेरामनचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला.
रतन राधेश्याम भौमिक (वय 31) असे त्याचे नाव आहे. वडवली येथील हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या वरेकर कुटुंबीयांचे मृतदेह सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याबाबत माहिती घेण्यासाठी भौमिक सकाळी 8.15 च्या सुमारास रुग्णालयात गेले होते. त्यांनी माहिती घेऊन वृत्तवाहिनीला कळवली होती. ते आणखी घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी रुग्णालयाच्या आवारात थांबले होते. त्या वेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात हलवण्यात आले; मात्र काही क्षणांत त्यांची प्राणज्योत मालवली.