पत्रकारांसाठी सहा टीप्स

0
825

खोटे गुन्हे टाळण्यासाठी पत्रकारांसाठी सहा महत्वाच्या टीप्स

महाराष्ट्रात पत्रकारांवर गंभीर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटना दररोज समोर येत आहेत.त्यामुळं सारेच पत्रकार अस्वस्थ आहेत आणि आपला नंबर कधी लागेल या जाणिवेनं धास्तावलेलेही आहेत.माध्यम जगातातील या घटनांचे पडसाद काल मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या बैठकीतही स्वाभाविकपणे उमटले.त्याबद्दल अनेकांनी आप-आपले विचार ,अनुभव कथन केले.मात्र विधिज्ञ जयेश वाणी यानी काही मौलिक सूचना मांडल्या आहेत.आपल्यावर खोटा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी त्यांनी सांगितलेली पथ्ये पाळली पाहिजेत.यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे सर्वानुमते मान्य केले गेले आणि त्यानुसार राज्यातील सर्वच पत्रकारांनी काळजी घेतली पाहिजे असे आवाहन करण्यात आले.
खोट्या गुन्हयांचा बडगा टाळण्यासाठीची पंचसुत्री
1) दैनिकांच्या कार्यालयात,जिल्हा कार्यालयात सीसीटीव्ही बसविणे गरजेचे आहे.सीसीटीव्ही असतील तर सार्‍या गोष्टींची नोंद त्यात होईल.
2) गुन्हे दाखल झाल्यावर त्यावर व्हॉठसअ‍ॅपवर चर्चा टाळावी.कारण आपण कोणती पाऊले उचलणार आहोत ते पोलिसांना समजते आणि ते सावध होतात.सुनील ढेेपे प्रकरणात व्हॉठस अ‍ॅपवर झालेली चर्चा आत्मघातकी ठरली हे नंतर समोर आले.
3) प्रत्येक जिल्हयात पत्रकार संघटनांनी किमान तीन वकिलांचे एक पॅनल तयार करावे,आणि आणीबाणीच्या प्रसंगी त्याच्या सल्ल्लयानं कार्यवाही करावी.पत्रकार संघटनांनी असे पॅनल तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
4) गुन्हा दाखल झाल्यावर किंवा तत्पुर्वी सरकारी व्यवस्थेवर विश्‍वास ठेऊ नये.ते खोटी आश्‍वासनं देत राहतात,आपण गाफिल राहतो आणि जास्तीत जास्त खोलात जात राहतो.ढेपे प्रकरणात शेवटपर्यंत वरिष्ठ काही काळझी करू नका असे सांगत होते.मात्र कोणीही मदत करीत नव्हते.
5) राजकारण्यांवरही आपण नको तेवढा विश्‍वास ठेवतो.त्याचा प्रत्येक वेळी उपयोग होतोच असं नाही.त्यामुळं कुणावर विश्‍वास ठेवण्यापेक्षा तातडीनं कायदेशीर मदत कशी मिळेल याची दक्षता घेतली पाहिजे.
6) शेवटचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणाही पत्रकारावर गुन्हा दाखल झाला तरी संबंधित शहरातील सर्व पत्रकारांनी एकत्र येत आपल्या पत्रकार बांधवास मदत केली पाहिजे.आज मित्र जात्यात आहे आपण सुपात आहोत हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे आणि मदत केली पाहिजे.
या काही टीप्स आहेत.पत्रकारांना कोठेही जावे लागते,वेळकाळाचे भान ठेवता येत नाही.त्यामुळे शत्रू कोठेही त्याला अडचणीत आणू शकतो हे सत्य असले तरी आपण किमान काळजी घेतली तर खोटया गुन्हयांपासून किमान पन्नास टक्के बचाव होऊ शकतो.  

7) शक्य असल्यास कार्यालयात Movement Register त्या मुव्हमेंटच्या कारण आणि दिनांकासह मेंटेन करावे जेणे करुन आपण कुठेही गेलो तरी नोंद कार्यालयात राहिल आणि खोटा गुन्हा दाखल झालाच तर आपल्याला पत्रकार नेमका कुठे आहे याची माहिती मिळेल. स्टिंग ऑपरेशनच्या वेळी वरिष्ठांना इमेल नक्की करावा आणि BCC मधे विश्वासु ( शक्यतो रक्ताचे नातेवाईक) यांना ठेवावे जेणे करुन आपल्या कुटुंबालाही वेळ पडल्यास आपल्या मदत करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here